WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

… प्रतिक्षा संपली! कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाला प्रारंभ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूरचे जागृत देवस्थान त्र्यंबोली मंदिराचे होणार  सुशोभिकरण
१ कोटी रूपयांचा निधी मंजूर, 
 खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर: भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र मंदिर परिसराच्या संपूर्ण सुशोभिकरणासाठी एकूण १० कोटी रूपयांचा आराखडा बनवला असून, तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्र्यंबोली देवी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आज शुभारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून मंदिर सुशोभिकरणाच्या कामाला आज सुरूवात झाली. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला. या देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी क वर्ग दर्जा मिळणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून, आपण त्र्यंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिलाय. त्यामुळे इथून पुढे दरवर्षी या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी  विकास निधी मिळणार असल्याची माहिती सत्यजित कदम यांनी दिली.
दरम्यान त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविक आणि पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकूण १० कोटी रूपयांचा आराखडा बनवला आहे. हा आराखडा मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. तर दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थस्थळं आणि देवस्थान सुशोभित करण्याचे आपले ध्येय आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. महापालिकेचे माजी सभापती विजय सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. या निधीतून मंदिर परिसरातील वरच्या बाजूचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रविंद्र मुतगी, माजी नगरसेवक आशिष ढवळे,  प्रकाश काटे, माजी महापौर दिपक जाधव, वैभव माने, राजसिंह शेळके, सीमा कदम उपस्थित होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.