राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा चुये येथे प्रचार शुभारंभ…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चुयेकरांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ…

कोल्हापूर, प्रतिनिधी – शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या चुये (ता. करवीर) येथील स्मृतीस्थळाला अभिवादन करून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ठरावधारक प्रामाणिक व स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ते कोणाच्याही भुलथापांना बळी पडणार नाहीत. येत्या १८ तारखेला ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला विजयी करतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळच्या साडेपाच लाख शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या भविष्याचा विचार करून समविचारी आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. दूध उत्पादकांचे हित, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सहकार क्षेत्राचे भविष्य यांना केंद्रस्थानी ठेवून आघाडीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याने या शुभारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील-सरूडकर, राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, गटनेते एकनाथ पाटील, राजू लाटकर, विजयराव देवणे, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, एम. आर. पाटील, सदाशिव चरापले, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, उमेश भोईटे, भिकाजी एकल, रणजीत पाटील, विश्वनाथ पाटील, रामराजे कुपेकर, सुभाष वाडकर, एस. के. पाटील, बबन रानगे, शशिकांत खवरे, कॉ. सम्राट मोरे, गणपतराव डोंगरे, निवास पाटील, भगवानराव जाधव, संभाजीराव देसाई, अमर पाटील-शिंगणापूरकर, प्रकाश पाटील, मोहन धुंदरे, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, पांडुरंग भांदिगरे, जीवन पाटील, श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, डी. एस. पाटील, विश्वास दिंडोर्ले, सखाराम चव्हाण, संग्राम पाटील, सागर धुंदरे, संभाजीराव पाटणकर, सभापती सागर पाटील, सभापती छाया देसाई, दत्तात्रय वारके, सुयोग वाडकर, मधुकर रामाणे, डॉ. के. एन. पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, सागर कोंडेकर, विष्णुपंत एकशिंगे, हिंदुराव पाटील यांच्यासह समविचारी आघाडीचे उमेदवार, जिल्हाभरातील ठरावधारक आणि दूध उत्पादक उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.