फेडरल बँकेकडून महापालिकेला सीएसआर अंतर्गत दोन ट्रॅक्टर ट्रॉली प्रदान

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार बळ; शहराच्या विकासासाठी सीएसआरमधून योगदान देण्याचे आयुक्तांचे आवाहन

कोल्हापूरTEAM WATCH : फेडरल बँकेच्या हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला 25 लाख रुपयची एक ट्रॅक्टर ट्रॉली असे सुमारे 50 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली प्रदान करण्यात आल्या. या ट्रॅक्टर ट्रॉलींचा लोकार्पण व हस्तांतरण सोहळा आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे पार पडला. फेडरल बँकेचे प्रतिनिधी संपत मुळे व हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने या ट्रॅक्टर ट्रॉली आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.   यावेळी फेडरल बँकेच्या प्रतिनिधींनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना, “शहराची स्वच्छता आणि वारसा जपणे ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून आमचेही सामाजिक उत्तरदायित्व आहे, असे प्रतिपादन केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

           सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाला गती मिळणार असून, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था बळकट करण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे.  यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि विविध आस्थापनांनी सीएसआरच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वातून मिळणारे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

           यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे,  फेडरल बँकेचे मिराजखान पठान, चातक देशपांडे, कुणाल ठाकरे आदी उपस्थित होते.

 

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.