हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; श्री महालक्ष्मीदेवी-अंबाबाई मंदिरात घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर TEAM WATCH घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने कोल्हापूर येथील ऐतिहासिक श्री महालक्ष्मीदेवी-अंबाबाई मंदिरात हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि समाजबांधवांनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्‍वराच्या मंदिरात घेतलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या शपथेवरून प्रेरणा घेऊन देशभरात अशा स्वरूपाचे विशेष उपक्रम राबवले जात आहेत.
या वेळी भगवान श्रीकृष्ण आणि श्री महालक्ष्मीदेवी-अंबाबाई यांच्या चरणी प्रार्थना करून भारत देशाला पुन्हा ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ अर्थात् रामराज्य बनवण्याचा दृढ निर्धार करण्यात आला. या प्रतिज्ञेद्वारे सनातन हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा ठेवणे, हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे, देवळे, गोमाता आणि स्त्रियांचे प्राणपणाने रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. तसेच आक्रमकांनी नष्ट केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी तन-मन-धनाचा त्याग करण्यासाठी सर्वांनी कटिबद्धता दर्शवली. यावेळी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणांनी परिसर निनादला होता.
या विशेष प्रतिज्ञा विधीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, डॉ. शिल्पा कोठावळे, सौ. वैष्णवी साळोखे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे बाबासाहेब भोपळे, हिंदू एकता आंदोलनाचे हिंदुराव शेळके, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप भिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. समितीच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू झालेल्या राष्ट्रकार्यात आणि आगामी धर्मकार्यात सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.