WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

खेळाडूंच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी भाजपा खासदार बृजभूषणला अटक झाली पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण..?

मुंबई – रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदाराला बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे, बॉलिवूडसह सर्व नामांकित लोकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अद्याप कारवाई होत नसल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजपाच्या महिला नेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन पीडित खेळाडूंना समर्थन दिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या खासदाराला वाचवण्यासाठी भाजपा आटापीटा करत आहे, त्याला संरक्षण दिले जात आहे. नवीन संसद भवनचे उद्घाटन होत असताना या पीडीत खेळाडूंना धक्काबुक्की करत पोलीस बळाच्या वापर करत जंतर मंतरवरून हुसकावून लावले. अत्याचारी खासदारावर पोलीस कारवाई करण्याऐवजी पीडितांवरच पोलीस अत्याचार करत आहेत. छोट्या छोट्या प्रसंगावर ट्विट करणारे पंतप्रधान या अतिशय गंभीर प्रकरणावर गप्प आहेत हे आश्चर्यकारक व संतापजनक आहे.

महिला कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी देशभरातून राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती पुढे येत असताना बॉलिवूडमधील कलाकार व इतर खेळाडूंनीही पुढे येऊन महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. खेळाडूंच्या पाठिशी उभे नाही राहिले तर अत्याचारी खासदाराला समर्थन दिल्याचा संदेश जाईल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा…
आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन दिवसांची आढावा बैठक आयोजित केली असून सर्व ४८ मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ही जागा वाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांची मते अजमावली जात आहेत. चर्चा सकारात्मक होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ज्यापद्धतीने मविआचे सरकार पाडले त्याचा तीव्र संताप जनतेत आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सुर बैठकीत उमटत आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

देशातील एकूण चित्र पहाता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत असेही चव्हाण म्हणाले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.