जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुल चे भरघोस यश, तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सहा विध्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र

आरवली TEAM WATCH  ृनुकत्याच डेरवण येथे सम्पन्न झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कुल च्या सहा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य दाखवत यश मिळवले . या सहा विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली . विध्यार्थ्यांनि मिळवलेल्या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुल चा स्वराज मिलिंद चव्हाण याने १४ वर्ष वयोगटात द्वितीय ,साइराज अरविंद सुर्वे १७ वर्षे वयोगटात तृतीय तर मुलींच्या गटात स्वरा सुजित इंजले हिने प्रथम व श्रिया विजय पंडित हिने द्वितीय क्रमांक पटकावला .तसेच परिणीती दिनेश कांबळे हिने १४ वर्षे वयोगटात द्वितीय व आर्या अनिल जोयशी हिने तृतीय क्रमांक पटकावला . या सर्व सहा विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अभिषेक पालशेतकर व पर्यवयक्षक संतोष साळुंके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आरवली – TEAM WATCH माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणे येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६-२७ अंतर्गत पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवईने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील एकूण चार नाट्य संघांनी सहभाग नोंदवला होता. भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘इलेक्ट्रिक वाहन – पुढचा मार्ग’ या महत्त्वपूर्ण विषयावर अत्यंत प्रभावी व प्रबोधनात्मक नाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या नाट्यात कलाकार देवान किंजळकर, आयुष ओकटे, संग्राम ओकटे, सोम ओकटे, श्रेया धामणाक, समृद्धी पाले, सिद्धी उजगावकर आणि अर्णवी कानाल, गायक- श्रवण हरेकर, वादक- साईराज सडकर, रुद्र मिरगल, प्रदीप वाडकर या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु. अर्णवी कानाल हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनय’ या श्रेणीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर कु. श्रेया धामणाक हिच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांकडून तिला विशेष रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक सूरज कदम, सिद्धी सुर्वे आणि सिमीन काझी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यात बाजी मारून प्रशालेचे नाव उंचावणाऱ्या या विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाचालक, शाळा समन्वय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.