WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वीर सावरकरांच्या विचारांचे स्मारक कोल्हापुरात उभारणार – आमदार राजेश क्षीरसागर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

महाराष्ट्र दिनी रंगला स्वा.सावरकरांच्या गीतांचा “तेजोमय तेजोनिधी” कार्यक्रम

कोल्हापूर – एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. अशा या थोर व्यक्तींच्या विचारांची गरज आजच्या युवापिढीला असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीचे विचार येणाऱ्या पिढीत रुजावेत यासाठी कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन, सकल हिंदू समाज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या आणि अजरामर झालेल्या गीतांचा भरतनाट्यम नृत्यकलाविष्कार “तेजोमय तेजोनिधी” या कार्यक्रमाचे प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमातील नृत्यकलेस आणि खासकरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या सूत्रसंचालनास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाची सुरवात राज्यनियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरानी रचलेल्या “हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “सागरा प्राण तळमळला”, “जयोस्तुते” अशा अनेक गीतांवर कलाकारांनी भरतनाट्यम नृत्यअविष्कार सादर केला यास प्रेक्षकांनी वन्स मोर ने दाद दिली. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार, देशभक्तीचे कार्य, घेतलेले कष्ट याची आजही जाणीव होते. काळ्या पाण्याची शिक्षा, सुमुद्रात उडी अशा अनेक प्रसंगांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मातृभूमी प्रती असलेले प्रेम समजते. याच विचारांची आजच्या समाजाला गरज असून, प्रत्येकाच्या मनावर मातृभूमी बद्दलचे प्रेम, देशभक्ती बिंबवणे कलाची गरज आहे. याकरिता कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यामध्ये हॉल, ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय आणि वीर सावरकरांच्या आयुष्यातील प्रसंग दाखविणारे म्युरल अशा पद्धतीची व्यवस्था असणार असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप महेश जाधव, विश्वहिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, सावरकर संघटनेचे नितीन वाडीकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झाडे, संभाजी उर्फ बंडा साळुंखे, गजानन तोडकर, बाबा वाघापूरकर, शालनताई शेटे, रुपाराणी निकम, रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, शाम जोशी, राजू मेवेकरी, संतोष पंडित, गुळवणी, वंदूरकर जोशी आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.