WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा–उद्योग मंत्री उदय सामंत

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुननगर येथील (देवचंद कॉलेज) येथे महा-रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, देवचंद शिक्षण समुहाचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्षा तृप्ती शहा, राहुल पंडित, रविंद्र माने, राजेखान जमादार, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या भागात सुरु करण्याची गरज आहे. सीमा भागासाठी ही योजना सुलभ करण्याचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील उद्योगांना ज्या प्रमाणे प्रोत्साहन देतो, त्याप्रमाणे या भागातील लोकांना दिले जाईल. सीमा भागातील नक्की प्रश्न काय आहेत. हे समजून घेण्यासाठी आगामी काही दिवसांत येथे मेळावा घेवून सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी  मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शंभुराज देसाई यांना या मेळाव्यासाठी आपण घेवून येवू. त्याचबरोबर सीमा वादावर जे-जे करावे लागेल ते-ते राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण करु, 

उद्योग मंत्री उदय सामंत

सीमा भागातील युवक-युवतींनी आपल्यातील कौशल्य व शैक्षणिक पात्रता ओळखून त्याप्रमाणे कंपनीची निवड करावी. येथील युवकांनी स्वत:ला एकटे समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहील. तसेच ज्या कंपनींनी गरजू उमेदवारांची नियुक्ती केली आहे, अशा उमेदवारांना त्या-त्या कंपन्यांनी सन्मानजनक वेतन द्यावे, अशी अपेक्षाही उद्योग मंत्री सामंत यांनी व्यक्त केली.  

खासदार धैर्यशील माने म्हणाले, सीमा भागातील  युवक-युवतींसाठी प्रथमच रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्याला युवक-युवतींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. ही बाब अभिमानास्पद असून या मेळाव्यातून केवळ नोकरी मागणारेच युवक निर्माण न होता अनेक उद्योजक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ‘हार्डवर्क’ला प्राधान्य द्यावे. स्पर्धात्मक युगात स्वत:ला स्पर्धेसाठी तयार ठेवावे. केवळ नोकरीवरच समाधान न मानता रोजगाराच्या अधिक संधी त्यांनी शोधाव्यात. ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली नाही अशा उमेदवारांनी निराश होवू नये. आपल्यातील कौशल्य ओळखून त्यांनी स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

 सीमा वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी या महा-रोजगार मेळाव्याप्रमाणेच  लवकरात-लवकर मेळावा आयोजित करावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी नोकरीसाठी पात्रता धारण केलेल्या सुमारे 25 युवक-युवतींना नोकरी प्रमाणपत्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध बँकांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत चार वाहनधारक लाभार्थींना वाहनांची चावी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बारा उमेदवारांना कर्ज मंजुरी पत्रे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  देण्यात आली.

या रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विविध 92 कंपन्यांनी आपला सहभाग दर्शविला. या मेळाव्याकरिता सुमारे चार हजार उमेदवारांनी आपली नाव नोंदणी केली. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय (कागल), एमआयडीसी, परिवहन, जिल्हा उद्योग केंद्राचे सतीश शेळके, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राचे संजय माळी यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माने तर आभार प्रदर्शन शुभम शेळके यांनी मानले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.