WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

दहावी-बारावी परीक्षा कशा हाेणार, नियाेजन कसे पहा– जिल्हाधिकारी, पाेलीस अधिक्षक काय म्हणाले !

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालकांनी सहकार्य करावे

*विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रामाणिकपणे यश मिळवावे

कोल्हापूर: इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.इयत्ता 12वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 यादरम्यान होत असून इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान होणार आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, तहसीलदार संतोष कणसे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिगंबर मोरे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. डी.पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी (योजना) केतन शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार 

कॉफीमुक्त परीक्षा अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यातही प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नये, याची खबरदारी घ्यावी. तसेच याबाबतीत तपासणी करण्यासाठी बैठी भरारी पथके तयार करुन यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करा. परीक्षा केंद्र परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करा. प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधित विषयाच्या व संबंधित शाळेच्या शिक्षकांव्यतिरिक्त अन्य शिक्षकांची नियुक्ती करा, अशा सूचना  दिल्या.

  • इयत्ता दहावी व बारावी परीक्षांसाठी 17 परिरक्षक केंद्र आहेत. इयत्ता बारावी साठी 68 मुख्य परीक्षा केंद्रे असून ते 53 हजार 676 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
  • इयत्ता दहावीसाठी 136 मुख्य परीक्षा केंद्रे असून 50 हजार 820 विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत.
  • इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात अनुचित प्रकार घडू नये, याबाबत तपासणी व नियंत्रण ठेवण्यासाठी 5 भरारी पथक नियुक्त 
  • इयत्ता दहावी परीक्षेसाठी 3 केंद्रे उपद्रवी असून 4 केंद्रे कुप्रसिद्ध तर बारावी ची 8 केंद्रे कुप्रसिद्ध 
  • अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करु नये, याबाबत व्यापक जनजागृती करा, असे सांगून जिल्हाधिकारी  रेखावार म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रामाणिकपणे यश मिळवावे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षा हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नसून आपली गुणवत्ता मेहनतीने सिद्ध करा, मनापासून अभ्यास करुन कठोर परिश्रमाने यश मिळवा, असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालकांनी सहकार्य करावे.

पाेलीस अधिक्षक शैलेश बलकवडे

सलाम या कार्यकर्तृत्वाला! करून दाखविले! सलग चाळीस तास कडा पहारा; एकमेकांच्या समन्वयातून आव्हानाचे शिवधनुष्य पेलले…जिल्ह्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. मागील दहा वर्षांत एखाद्या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला असल्यास याबाबतची आद्ययावत माहिती तयार करावी, जेणेकरुन त्या त्या केंद्रावर अधिक लक्ष देता येईल, असे  बलकवडे यांनी सांगितले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.