हार्दिक पांड्याने लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नताशा पांढऱ्या गाऊनमध्ये तर हार्दिक काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा 2 वर्षांचा मुलगाही या लग्नात सहभागी झाला होता. नताशा सर्बियाची अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहे. व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी)च्या निमित्ताने दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले. बुधवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला दोघेही हिंदू धर्मानुसार लग्न करणार आहेत.
लग्नाचे विधी तीन दिवस
13 फेब्रुवारीपासून लग्नाचे विधी सुरू झाले, जे 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. लग्नाची थीम पूर्णपणे पांढऱ्या रंगात ठेवण्यात आली होती. वधू म्हणून नताशाने पांढरा गाऊन परिधान केला होता. 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासूनच लग्नाआधीची मेंदी, संगीत आणि हळदीची फंक्शन्स सुरू झाले. हार्दिक आणि नताशा 13 फेब्रुवारीला संपूर्ण कुटुंबासह मुंबई विमानतळावर दिसले होते. तेथून सर्वांनी राजस्थानमधील उदयपूरला फ्लाइट पकडली. नताशाचे कुटुंबीयही विमानतळावर दिसले.
मुंबईतील एका क्लबमध्ये हार्दिक आणि नताशा यांची भेट झाली. तेथून दोघांमध्ये मैत्री झाली.पुढे जाऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हार्दिक जेव्हा त्याच्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात होता तेव्हा नताशाने त्याला खूप साथ दिली. जानेवारी 2020 मध्ये, दोघांनी दुबईमध्ये एकमेकांना अंगठी घातली आणि अधिकृतपणे लग्न केले.