शिराळा (जी.जी.पाटील)
रासायनिक खताच्या होणाऱ्या अतिवापरामुळे शेती दिवसेन दिवस नापीक होऊ लागली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवघत करून सेंद्रिय शेतीचा आधार घेत पुर्वज्यानी ज्या प्रमाणे आपल्याकडे शेती सोपवली त्याच प्रमाणे चांगल्या अस्वस्थे असणारी जमीन आपण आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देवूया असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कासेगाव ता. वाळवा येथे मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराज पाटील होते.
आमदार नाईक म्हणाले, ग्रामीण भागात शेतीचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे.या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्ती जास्त उत्पादन घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जमिनीचे व आपले आरोग्य कायम सुदृढ राहण्यासाठी रासायनिक शेतीकडे न वळता सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महा ऑरगॅनिकचे अध्यक्ष कृषी भूषण अंकुश पडवळे म्हणाले, आता शेतीची संकल्पना गाव पातळी पासून जगाच्या पातळी पर्यंत बदलायला हवी. ऊसा व्यतिरिक्त इतर पिकात ही बदल करणे गरजेचे आहे. पिक आणि पाण्यात बदल केला तर दीड पट उत्पन्नात वाढ होऊ शकते. वेळीच सेंद्रिय शेतीकडे आपण वळलो नाही तर पुढील दहा वर्षात चाळीस टक्के जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होईल.
एस.एन.एम.अँग्रो टेकचे एम.डी. सतीश मोहोड म्हणाले, आपण सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान हे जुनेच आहे .फक्त आता कोणत्या घटकाचे प्रणाम किती असावे हे निश्चित करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करत आहे.हेच या तंत्रज्ञानाचे विशिष्ट्य आहे. खर्च कमी झाला तरच उत्पादन वाढेल. जमिनीचा पोत सुधारून पिक सुदृढ करणे गरजेचे आहे.
स्वागत व प्रास्ताविक मी शेतकरी चे मुख्य प्रवर्तक संजय देशमुख यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की आधुनिक शेती करून शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक संपन्न करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते मी शेतकारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सौ.मृणाल देशमुख,नीता मोहोड, प्रवीण बोरगावे ,ग्रोवीट इंडिया प्रा.ली.चे एम.डी. सौरभ अगरवाल,कराड शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सताप्पा खरबडे,यूनिक वॉटर चे जयवंत सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मनीष बर्डे, विद्धेश पाटील, अशोक माने, विनोद तोडकर, दिलीप देशमुख, निवास पाटील ,प्रसाद पवार , संगीता तोडकर, आनंद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घोडे पाटील यांनी तर आभार अशोक माने यांनी मानले.