पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
बापरे…जीवरक्षक धावला म्हणून चार महिलांचा जीव वाचला…!
वेळ घालवू नका. आज वेळ राखून ठेवा.. एन्जाँय करा.. काेल्हापुरात पहा दुबईचा नजराणा
पंचगंगेत बुडणाऱ्या चार महिला बचावल्या
जीव रक्षक उदय निंबाळकर यांचं प्रसंगावधान
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पंचगंगा नदीघाटावरील थरार
चारही महिला सुखरूप
VIDEO पहा
कोल्हापुरातील पंचगंगा नदीत बुडणाऱ्या चार महिलांना जीव रक्षक उदय निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. त्यामुळे निंबाळकरांच्या सतर्कतेने या चार महिलांचा जीव वाचलाय. लातूर येथील कोमल क्षीरसागर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापुरात पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या कुटुंबीयातील काही महिला पंचगंगा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरल्या होत्या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं यातील माधुरी अंबाडे ही पाण्यात बुडू लागली या महिलेला वाचवण्यासाठी कोमल क्षीरसागर शामल क्षीरसागर आणि मंगल मगर या तिन्ही पाण्यात उडी घेतली मात्र एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघीही पाण्यात बुडू लागल्या इतर कुटुंबीयांचा आरडाओरड ऐकून मॉर्निंग वॉक साठी आलेले पंचगंगा विहार मंडळाचे जीव रक्षक उदय निंबाळकर यांनी तात्काळ नदीत उडी घेतली आणि प्रसंगावधान राखत चारही महिलांना इनर ट्यूबच्या साह्याने त्यांना बाहेर काढलं. पाण्यात श्वास भुदमरल्याने त्यांनी तात्काळ या महिलांना सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केलं सध्या चारही महिला सुखरूप आहेत. उदय निंबाळकर यांनी सतर्कता दाखवत या महिलांचा जीव वाचवल्याने या कुटुंबीयांनी निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.