बापरे…जीवरक्षक धावला म्हणून चार महिलांचा जीव वाचला…!
कोल्हापुरातील पंचगंगा नदीत बुडणाऱ्या चार महिलांना जीव रक्षक उदय निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. त्यामुळे निंबाळकरांच्या सतर्कतेने या चार महिलांचा जीव वाचलाय. लातूर येथील कोमल क्षीरसागर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापुरात पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या कुटुंबीयातील काही महिला पंचगंगा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरल्या होत्या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं यातील माधुरी अंबाडे ही पाण्यात बुडू लागली या महिलेला वाचवण्यासाठी कोमल क्षीरसागर शामल क्षीरसागर आणि मंगल मगर या तिन्ही पाण्यात उडी घेतली मात्र एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघीही पाण्यात बुडू लागल्या इतर कुटुंबीयांचा आरडाओरड ऐकून मॉर्निंग वॉक साठी आलेले पंचगंगा विहार मंडळाचे जीव रक्षक उदय निंबाळकर यांनी तात्काळ नदीत उडी घेतली आणि प्रसंगावधान राखत चारही महिलांना इनर ट्यूबच्या साह्याने त्यांना बाहेर काढलं. पाण्यात श्वास भुदमरल्याने त्यांनी तात्काळ या महिलांना सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केलं सध्या चारही महिला सुखरूप आहेत. उदय निंबाळकर यांनी सतर्कता दाखवत या महिलांचा जीव वाचवल्याने या कुटुंबीयांनी निंबाळकर यांचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रत्येक नागरिकाला सामावून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार |
त्या चाैघींचे प्राण कसे वाचले पहा… व्हिडीओ! पंचगंगेत घडला थरार
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.