तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
‘सिम्बा’ ऍनिमेशन पटाच्या निर्मिती प्रक्रियेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती
कोल्हापूर : लहानांच्या आवडीचा ‘सिम्बा’ या ऍनिमेशन पटाची निर्मिती प्रक्रिया ते पडद्यावर अथवा टीव्हीवर ‘सिम्बा’ चे प्रसारण या सर्व टप्प्यांची माहिती आज शालेय विद्यार्थ्यांनी शाहू मिलमधील शिबिरात घेतली.राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत आज इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स ऍनिमेशन स्टुडिओ’ज चे क्रिएटिव्ह प्रमुख भाऊसो पाटील यांचे ऍनिमेशन आणि कार्टुन फिल्म निर्मिती बाबत माहितीपूर्ण शिबिर घेण्यात आले.
भाऊसो पाटील म्हणाले, ऍनिमेशन म्हणजे चलचित्र आहे. 2 डी ऍनिमेशन (मूक) 1908 मध्ये तर आवाजासह पहिले 2 डी ऍनिमेशन 1928 मध्ये सुरु झाले. ऍनिमेशन बनण्याची प्रक्रिया, संकल्पना, संहिता लेखन, स्थळ निश्चिती, कॅरॅक्टर निवड, ऍनिमेशन अशा टप्प्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्टुन फिल्म निर्मितीत चित्रकलेचे महत्त्व त्यांनी विशद केले. शिक्षणाबरोबरच खेळाला व अंगी असलेल्या कलागुणांना आवर्जून वेळ द्या, असेही त्यांनी सांगितले.
यासाठी डिजिटल पेंट आर्टिस्ट शुभम बिरांजे यांनी सहकार्य केले. दळवी’ज आर्ट चे प्राचार्य अजेय दळवी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
रविवारी विविध प्रांतातील कलाकारांच्या लोककलांचे सादरीकरण नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांची 14 मे रोजी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत विविध नृत्य प्रकारांवर आधारित विनामूल्य प्रशिक्षण व सादरीकरण कार्यशाळा होणार आहे.तर विविध प्रांतातील कलाकारांचा लोककलेचा विनामूल्य कार्यक्रम श्री छत्रपती शाहू मिलमध्ये रविवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.