तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर : निवडणूक प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व यंत्रणेने आतापासूनच आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संगणक परिचालक यांच्या सोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, निवडणूक आयोगाची प्रतिमा निर्माण करण्यात निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असते. आगामी लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे सर्व पात्र तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. तृतीयपंथीयांच्या गुरुंचे सहकार्य घेवून मतदार नोंदणी वाढवण्यासाठी नियोजन करा.
मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार याद्या तपासण्याचे काम वेळेत पूर्ण करुन घ्या. नव मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे, मतदार स्थलांतर झाल्याने वगळणी, मयत, दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठीची कार्यवाही करुन मतदार याद्या निर्दोष होतील यासाठी प्रयत्न करा. मतदार यादीत मतदारांची नावे तपासून घेण्यासाठी शिबीरांचे आयोजन करा. मतदार यादीत नाव नसल्यास नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज भरुन घ्या. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा असल्याची खात्री करा. अन्यथा त्या-त्यार केंद्रावर सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशाही सूचना देवून लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रित होण्याची शक्यता निर्माण झाली तर प्रशासनाने सज्ज रहावे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
मतदारांना मतदान ओळखपत्र मिळवून देणे, मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे, अस्पष्ट छायाचित्रे, मतदान ओळखपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी, आदी विषयांचा आढावा घेवून लोकसभा व विधानसभा मतदार संघनिहाय मतदार याद्यांचा त्यांनी आढावा घेतला.स्वीप मतदार जनजागृतीबाबत चर्चासत्र – बैठकीनंतर स्वीप मतदार जनजागृतीबाबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, नोडल अधिकारी व कॅम्पस अँम्बेसिडर विद्यार्थ्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकारी डॉ श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. नव मतदार व भविष्यातील मतदारांची निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी ‘निवडणूक साक्षरता मंडळ’ स्थापन करण्याचे आवाहन यावेळी श्री. देशपांडे यांनी केले. युवक व नवमतदारांनी मतदान प्रक्रीयेत सहभागी होणे आवश्यक आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नव मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक साक्षरता मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.