| अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संदीप कांबळे वाकरेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, उपाध्यक्ष मा. श्री. मोहन कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा मा. श्रीमती शीतल तिवडे, शहर अध्यक्षा मा. सौ. स्वाती काळे, भुजंग कांबळे, सुभाष कांबळे यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. |