गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन…
कोल्हापूर प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा बुधवार 12 रोजी 51 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राजाराम कारखान्याच्या प्रचाराच्या धामधूमिती बुधवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात कार्यकर्त्यां कडून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सकाळी नऊ ते दोन व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी यशवंत निवास येथे उपलब्ध असणार आहेत.
दरम्यानच्या काळात सतेज क्रिकेट स्पर्धा, फळे वाटप या यासह जिल्हा काँग्रेस कमिटी, विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. बावड्यातील विविध मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
दरम्यान इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुला-मुलींसाठी दोन गटात भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेतील मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.