अकीवाट–खिद्रापूर–कुरुंदवाड बस सेवा बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय वाढली

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना शिरोळ तालुक्याच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुख सय्यद मॅडम यांना निवेदन

अकीवाट – अकीवाट गावातून खिद्रापूर मार्गे कुरुंदवाड येथे जाणारी सकाळी ९ वाजताची बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, अचानक सेवा बंद झाल्याने पर्यायी वाहतूक नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुरुंदवाड हे तालुक्यातील प्रमुख शहर असून येथे रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोठी दुकाने तसेच भाजीपाला बाजार उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व मजूर यांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः सकाळच्या वेळेत ही बस वेळेत पोहोचण्यासाठी अत्यावश्यक मानली जात होती. मात्र, खिद्रापूरकडून येणारी सकाळची बस बंद झाल्याने अनेकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना शिरोळ तालुक्याच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुख सय्यद मॅडम यांना निवेदन देण्यात आले. बंद असलेली बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे, तालुकाप्रमुख निलेश तवंदकर, तालुका चिटणीस मंगेश पाटील, गणेश सुतार, सचिन मठपती, श्री उगळे, स्वप्नील चव्हाण, ओंकार बाबर, गणेश चव्हाण, प्रणव जाधव, सागर लोहार यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.