|
ॲड. भारत सोनुले यांच्या युक्तिवादाची न्यायालयात दखल; जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
कागल | TEAM WATCH : कागल तालुक्यात चर्चेत असलेल्या POCSO आणि युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात अटक झालेल्या संशयित आरोपीला अवघ्या १५ दिवसांत सशर्त जामीन मंजूर झाला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. भारत सोनुले यांनी केलेल्या युक्तिवादानंतर कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक ४ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी जामीन अर्जावर सुनावणी झाली. काय आहे नेमके प्रकरण?या प्रकरणी २७ सप्टेंबर रोजी कागल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७, ७८, ३५१(२), ३५२ तसेच POCSO कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी संशयित आरोपीला अटक करण्यात आली. तक्रारीनुसार, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून पीडित युवतीला व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेजद्वारे वारंवार संपर्क करून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात युवतीच्या नातेवाईकांनी सहा महिन्यांपूर्वी आरोपीला संपर्क न करण्याची ताकीद दिल्याचेही सांगण्यात आले. घटनेच्या दिवशी युवतीचा भाऊ अचानक घरी आला असता, युवती आरोपीशी मोबाईलवर बोलत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईकांनी आरोपीशी संपर्क साधून जाब विचारला. याच घडामोडींनंतर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. सरकारी पक्षाचा जामिनाला विरोधजामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले. आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असून, गुन्ह्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. आरोपीला जामीन मिळाल्यास फिर्यादी आणि साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच तपास अपूर्ण असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. फिर्यादीनेही न्यायालयात उपस्थित राहून जामीन मंजूर करू नये, अशी मागणी केली. ॲड. भारत सोनुले यांच्या युक्तिवादाने मांडली बचावाची बाजूआरोपीच्या वतीने ॲड. भारत सोनुले यांनी न्यायालयात बाजू मांडताना आरोपी आणि युवती यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. त्यामुळे जबरदस्ती केल्याचा आरोप मान्य करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. युवती मोबाईलवर चॅटिंग करताना आढळल्यानंतर आरोपीला तिच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. युवतीच्या आत्महत्येस आरोपीच कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. आरोपी विद्यार्थी असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. युवतीने आरोपीविरोधात नातेवाईकांकडे तक्रार केली नसल्याचा मुद्दा मांडतानाच बचाव पक्षाने संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केली. न्यायालयाकडून अटी-शर्तींसह जामीन मंजूरदोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. हा जामीन अटी व शर्तींसह देण्यात आला आहे.या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. भारत सोनुले, ॲड. सरोज देसाई, ॲड. प्रिती देवर्डेकर, ॲड. स्नेहलता यादव, ॲड. स्वालेहा नालबंद, ॲड. आकाश साठे, ॲड. वृषाली सावंत आणि ॲड. वृषाली इंगळे यांनी काम पाहिले. ॲड. सतीश कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. महत्त्वाची नोंद : आरोपीला जामीन मंजूर होणे म्हणजे आरोपांतून निर्दोष मुक्तता नव्हे. प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि अंतिम दोषनिश्चिती ही न्यायालयीन प्रक्रियेत ठरणार आहे. याआधीही अधिकाधिक वाचल्या गेलेल्या या बातम्या पहा.. लिंकवर क्लिक करा…
|
CRIME_ कागलमधील बहुचर्चित POCSO प्रकरणाला नवे वळण; १५ दिवसांत आरोपीला सशर्त जामीन
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
































































