व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसवर प्रशासनाची कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याने राजारामपुरी येथील मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आज महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत सीलबंद करण्यात आले.राजारामपुरी येथील पाचव्या गल्लीतील जयश्री हाइट्स, शॉप क्रमांक १, सी. एस. क्रमांक १८४७ येथे मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आहे. या दुकानात व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेमार्फत संबंधितांना दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही विहित मुदतीत व्यवसाय परवाना प्राप्त करून न घेतल्याने १३ ऑक्टोबर रोजी दुकान सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार व सहायक आयुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत उपद्रव शोध पथकासह कर अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, कर सहायक अच्युत अडुरकर तसेच मदतनीस सनी सरनाईक व मलिक भोसले यांनी सहभाग घेतला.महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करावा, तसेच परवान्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
![]() |
![]() |






























































