महापालिकेची ३० लाखांची वसुली….घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर-TEAM WATCH : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत थकीत घरफाळा वसुली आणि विनापरवाना वापराविरोधात कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्र. ४, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत आरसीसी कोचिंग क्लासेस या मिळकतीचा घरफाळा थकीत असल्याने ती सील करण्यात आली. तसेच वटेश्वर महादेव मंदिराजवळील पेट्रोल पंपालगत असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरचा विनापरवाना वापर सुरू असल्याने संबंधित मिळकतही सील करण्यात आली.

महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत थकीत रकमेच्या वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या. या कारवाईदरम्यान दिवसभरात एकूण ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त परितोष कंकाळ व सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. यामध्ये अधीक्षक श्रीमती अर्चना प्रभावळे, लिपिक भगवान मांजरे, विजय वाघेला, राहुल लोखंडे तसेच उपद्रव शोध पथकाच्या जवानामार्फत करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.