… मिळाला जामीन… बंदूक, खंडणी व युक्तीवाद —वाचा सविस्तर प्रकरण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*पिस्तुलीचा धाक दाखवून १० लाखांच्या दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन ३० दिवसात मंजूर – पिस्तूल जप्ती आणि गुन्ह्यातील काही रक्कम जप्ती अद्याप नाही तरीही ॲड भारत सोनुले यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक*

कोल्हापूर :-TEAM WATCH 

फिर्यादीला अल्पदरात सोने देतो असे सांगून कुरुंदवाड येथे बोलवून घेऊन कुरुंदवाड शहरात भरदिवसा पिस्तुलीचा धाक दाखवून १० लाख ३५ हजार रुपयांचे दरोडा प्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात एकूण ६ आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१०(२) , ४५, ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ४ व २७ प्रमाणे दि २१ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या  गुन्ह्यातील मुख्य आरोपी महिला हिला दि ३० जून २०२६ रोजी अटक करण्यात आली होती.

सदर आरोपीचा जामीन अर्ज आरोपीचे वतीने ॲड भारत सोनुले यांनी जयसिंगपूर येथील जिल्हा न्यायाधीश यांचे कोर्टात दाखल केला होता सदर अर्जाची सुनावणी दि ३१ जुलै २०२६ रोजी पार पडली. यावेळी आरोपीविरूद्ध पूर्वीचे गुन्हे असलेने तसेच आरोपी ही परराज्यातील असलेने आणि आरोपीने सदर गुन्ह्यात मुख्य भूमिका निभावली असून तिच्याकडून अद्याप पिस्तूल जप्त केलेले नाही. आणखीन दोन आरोपी निष्पन्न झालेले नाहीत या कारणाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असे म्हणणे देत सरकार पक्षाने जोरदार हरकत घेतली होती.

घरासाठी स्टील देतो सांगून कागल मध्ये ९ लाख ७६ हजाराची फसवणूक

आरोपीचे वकील ॲड सोनुले यांनी आरोपी विरुद्ध पूर्वीचे गुन्हे हे केवळ खोट्या आणि चुकीच्या स्वरूपाचे असून त्यात आर्थिक लाभ मिळाल्यानंतर फिर्यादी दिलेल्या तक्रारी मागे घेतल्या आहेत असे सांगितले, फिर्यादीने गुन्हा दाखल करण्यास ६ दिवसांचा विलंब केला असल्याने फिर्याद खोटी व बनावट असल्याचे नमूद करत फिर्यादी शेती करत असलेने एका दिवसात १० लाख कॅश उपलब्ध करतो ही बाब संशयास्पद असून आरोपीने देखील फिर्यादीवर तक्रार दाखल केली आहे असे प्रभावीपणे मांडणी केली. ह्याच गुन्ह्यातील इतर आरोपीचे जामीन मंजूर झाल्याने आरोपीने गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही असा युक्तिवाद केला. तसेच आरोपीची ओळख परेड झाली असून आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक नाही. पिस्तूल आणि रक्कम ही तक्रारीत जाणीवपूर्वक आरोपीला तुरुंगात ठेवण्यासाठी केलेले खोटे आरोप आहेत असा युक्तिवाद न्यायालयात केला.

४ वर्षे जेलमध्ये अडकले… नि प्रभावी युक्तिवादाने शेवटी जामीनावर सुटले!

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मे.जिल्हा न्यायाधीशसो जयसिंगपूर यांनी आरोपीचा जामीन अर्ज अटी व शर्तीवर मंजूर केला आहे.सदर आरोपी तर्फे ॲड भारत सोनुले, ॲड भास्कर माने , ॲड प्रिती देवर्डेकर,ॲड सरोज देसाई , ॲड स्नेहलता यादव , ॲड स्वालेहा नालबंद, ॲड वृषाली इंगळे, ॲड आकाश साठे यांनी काम पाहिले.

गुन्हा खंडणीचा… मात्र कोर्टासमोर असा मिळाला जामीन! वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.