अपहरण करून ३ लाखांची खंडणी मागणीच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन ; मुरगूड पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल
कोल्हापूर :-WATCH TEAM
३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी हमीदवाडा येथील एका इसमास आणि त्याचे मित्राला अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी ७ जणांचे विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(२),११५(२),११८(२),१२६(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ आरोपींना अटक झाली होती. यातील आरोपी रोहित लोखंडे याने जामीन मिळावा याकरिता मे. जिल्हा न्यायालय, कोल्हापूर या ठिकाणी ॲड भारत सोनुले यांचेमार्फत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी दिनांक ०७/०७/२०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर क्र १ यांचे कोर्टात पार पडली होती.
सदर सुनावणी वेळी फिर्यादीला जखमा झालेल्या असून आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला वेळोवेळी संपर्क करून खंडणी मागितल्याचा प्रथमदर्शनी पुरावा असल्याचा आणि आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याने व आरोपीवर पूर्वीचे गुन्हे दाखल असल्याने तो सराईत गुन्हेगार असल्याचे कथन करून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात असा आग्रही युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता.
*कर्जाची रक्कम मागणे म्हणजे खंडणी नव्हे..! ॲड भारत सोनुलेंची कोर्टात ठाम भूमिका*
*यातील फिर्यादी आणि आरोपी क्र ०१ यांचे आर्थिक देवाण घेवाणीतून वाद होते. यातील फिर्यादी हा आरोपीची गुंतवलेली रक्कम देणेबाकी होता. ती रक्कम परत मागणे म्हणजे खंडणी मागणे नाही. खंडणीचे कलम गुन्ह्यास स्पष्टपणे लागू होणार नाही. अशी ठाम भूमिका आरोपीचे वकिलांनी मे. कोर्टात युक्तिवाद करताना मांडली.*
परंतु आरोपीचे वकील ॲड भारत सोनुले यांनी आरोपी हा गुन्हा घडले स्थळी उपस्थित नव्हता, आरोपीची गुन्ह्यातील भूमिका नेमकी कोणती ह्या बाबत एकही साक्षीदार व फिर्यादी सांगत नाही. आरोपी केवळ इतर आरोपींच्या संपर्कात आला म्हणून त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित होत नाही , आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक नाही सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास झाला असून पुढील न्यायालयीन कामकाजासाठी आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवणे न्यायोचित होणार नाही तसेच आरोपीविरुद्ध पूर्वीचे गुन्हे दाखल होते ह्या एकमेव आधारावर जामीन अर्ज फेटाळला जाऊ शकत नाही असा प्रभावी युक्तिवाद न्यायालयात केला.
आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद आणि उच्च न्यायालयातील न्यायनिर्णयाचे दिलेले दाखले पाहून दि २२.०७.२०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश क्र १ यांनी आरोपीचा जामीन अर्ज अटी आणि शर्थी सहित मंजूर केला आहे.
सदर आरोपीतर्फे ॲड भारत सोनुले, ॲड सरोज देसाई, ॲड प्रिती देवर्डेकर, ॲड स्नेहलता यादव, ॲड स्वालेहा नालबंद, ॲड वृषाली इंगळे , ॲड आकाश साठे यांनी काम पाहिले तर ॲड सतीश कुंभार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
अधिक वाचलेल्या या बातम्या तुम्ही ही वाचा CRIME
उच्च न्यायालयाच्या काेल्हापूर सर्किट बेंचचा दिलासा; या दोन आरोपींना अटकपूर्व जामीन











































































