पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १,३७५ निराधार लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नरतवडे येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा कार्यक्रम; शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

राधानगरी प्रतिनिधी (विनायक जितकर) – समाजातील निराधार, गरजू आणि वंचित घटकांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने जय भवानी मंगल कार्यालय, नरतवडे येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील १ हजार ३७५ लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “समाजातील निराधार, वंचित आणि गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा आधार मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून १ हजार ३७५ लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र देताना विशेष समाधान वाटत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गरजू नागरिकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

१,३७५ लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरीचे प्रमाणपत्र मिळाल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तळागाळातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात आश्वासक बदल घडवणे, हेच आमचे ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवनमान अधिक सुरक्षित व सुसह्य व्हावे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणदादा जाधव, शरद सहकारी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन अशोकराव फराकटे, संजय गांधी निराधार समितीचे राधानगरी अध्यक्ष दीपक शेट्टी, प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, शरद सहकारी सूतगिरणी संचालक सुभाष चौगुले (बापू), शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी चौगुले, नवनियुक्त सदस्य दीपक पाटील, तुकाराम कुंभार, सुभाष पाटील, संदीप पाटील, सुभाष पाटील, सुभाष जाधव, संतोष पाटील, प्रल्हाद पाटील आदी मान्यवरांसह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.