चोरी केली, घर पेटवले; मात्र, माेठ्या शिताफीने शाहूपुरी पोलिसांनी शाेधले…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर : घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने व रोकड लंपास केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावणाऱ्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण तपास, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या खळबळजनक गुन्ह्याचा छडा लावत तब्बल ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काटेमळा परिसरातील मुक्त सैनिक वसाहत येथील ईरा गार्डन अपार्टमेंटमध्ये राहणारे शिवाजी आकाराम पाटील (वय ६५) यांच्या घरात ५ जून रोजी सायंकाळी ६ ते ६ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. घरातील देव्हाऱ्यातील ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि कपाटातील २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्यानंतर आरोपीने घराला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, आकाश जाधव तसेच गुन्हे शोध पथकातील मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर, महेश पाटील, गौरव शिंदे, राहुल पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, सचिन पांगे आणि उत्तम पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करीत आहेत.

CRIME घर फोडलं.. 12तासात पोलिसांनी पकडलं.. नि काय सापडलं!वाचा सविस्तर

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२६(ग), ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आशिष जयकुमार पाटील (वय २४, रा. मुक्त सैनिक वसाहत, ईरा गार्डन अपार्टमेंट, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. CRIME -गुन्हा घडण्यापूर्वीच पाेलिसांच्या तावडीत फसले…पाचगावात बंदुकीसह सापडले

कसून चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाचा कोल्हापुरी साज, ११ सोन्याच्या अंगठ्या तसेच २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

CRIME: 3 वर्षे नंतर संपवीन म्हणाला ;शाहूपुरी पोलिसांनी अडकविला!

CRIME च्या बातम्या वाचण्यासाठी लिंकला क्लिक करा.. बेशिस्त आणि नियोजनशून्य सत्कार सोहळे..

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.