WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १००वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मणक्याची १०० वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर केक कापून आनंद साजरा… ‘द स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने उपक्रम…

कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे १० रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’ च्या सहकार्याने हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमातंर्गत करण्यात आलेल्या मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रियांची संख्या १०० वर पोहचली असल्याची माहिती ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’चे प्रमुख, ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि हॉस्पिटलचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणामुळे विशेषत: शेतकरी व कष्टकरी लोकामध्ये मणका विकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा गरीब व गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी १९ एप्रिल रोजी मोफत मणका शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगटातील १० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेसाठी अन्य हॉस्पिटलमध्ये सुमारे ५ ते १० लाख रुपये खर्च येतो. मात्र, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाऊंडेशनच्यावतीने या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. शनिवारी या उपक्रमांतर्गत १०० वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मणक्याची १०० वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर्स व सहकाऱ्यानी केक कापून आनंद साजरा केला. डॉ. शेखर भोजराज, डॉ. तुषार देवरे, डॉ. सलीम लाड यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. हृषीकेश मेहता, डॉ. शैलेश हडगावकर, न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. बी. सी. पाटील, डॉ. अमोल गोवईकर, डॉ. उमेश जैन, डॉ. सिद्धार्थ निगडे यांच्यासह स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर्स, भूलरोग तज्ञ डॉ. संदीप कदम, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व सहकारी उपस्थित होते.

स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज म्हणाले, ‘द स्पाईन फाउंडेशन मुंबईच्या’वतीने डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून स्पाईन ओपीडी आणि सर्जरी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातर्गत १०० हून अधिक रुग्णावर अतिशय गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करता आल्याचा आनंद व समाधान आहे. मणका आजारावर मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एन्डोस्कोपिक स्पाईन सर्जरीही केल्या जातात. गरीब व गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा.

डॉ. डॉ. एस . ए. लाड म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ‘द स्पाईन फाऊंडेशन’च्या सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत १२०० हून अधिक गरीब रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. यातील गंभीर आजार असलेल्या १०२ रूग्णावर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, द स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मोफत स्पाईन सर्जरी करणारे डी. वाय. पाटील हॉस्पीटल हे गडचिरोलीनंतर देशातील दुसरे मोठे सेंटर बनले आहे.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत हि सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.