WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राजकीय पुढाऱ्यांनो प्रभु रामचंद्राचे आदर्श समाेर ठेऊन देशसेवा करा 

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात,या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते.महाराष्ट्रात नवीन वर्ष “गुढीपाडवा” म्हणून साजरा केला जातो तर इतर राज्यांत वेगवेगळ्या पध्दतीने हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केल्या जातो.याच महिण्यात चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्म झाला.त्याचप्रमाणे याच महीण्यात सात दिवसांनी महाबली हनुमान यांचा जन्म झाला.म्हणजे चैत्र महिन्यात मर्यादापुरुषोत्तम रामांचा जन्म व महाबली हनुमान यांचा जन्म म्हणजे एक दैवी लीलाच म्हणावी लागेल. यामुळे संपूर्ण भारतात दरवर्षी रामनवमी व हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने व थाटाने साजरी करण्यात येते. रामनवमीला भजन, कीर्तन व मोठ-मोठ्या झांक्या काढून संपूर्ण भारतात श्री रामांचा  जयघोष दिसून येतो व या दिवशी संपूर्ण माध्यमातून श्रीरामाचे नामस्मरण केल्या जाते.आज जगात ज्या-ज्या ठीकाणी सत्यता व संयमता दिसून येते यामागे मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचीच लिला आहे.भारतात बहुसंख्य हिंदू असतांना सुध्दा सर्व धर्मांना घेऊन चालण्याचा मान फक्त भारतीय संस्कृतीमध्येच आहे. कारण संस्कृती,सन्मान,सभ्यता,संयमता, दृढनिश्चयता, आपुलकीची भावना आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता फक्त भारतीय संस्कृतीमध्येच दिसून येते.कारण भारतात सर्वच धर्मांचे लोक एकोप्याने आणि आनंदाने रहातात.त्यामुळे संपूर्ण हिदु धर्म राममंदिर बांधकामाच्या प्रतीक्षेत होता व हे संपूर्ण काम कायद्याच्या चाकोरीतून होवून राम मंदिर उभारल्या जात आहे.

आज भारतात हिंदू धर्मामध्ये संयमता दिसून येते ती फक्त प्रभूराचंद्राच्या आशीर्वादानेच.यामुळे विदेशी नागरिकांची जगातील पहीली पसंती भारत असल्याचे दिसून येते.यामागे फक्त प्रभूराचंद्रांचेच आदर्श म्हणावे लागेल. प्रभूराचंद्राचा आशिर्वाद भारतीयांना आहे.त्यामुळे या धर्तीवर प्रभूश्रीराम सर्वांचेच आहे आणि राहील.कारण अयोध्येत राम जन्मले हे वास्तव्य आहे याची पुष्टी भारतीय पुरातत्त्व विभाग व विदेशातील अनेक पुरातत्त्व विभागाने जाहीर केले आहे.श्री रामाचा जप आपण जन्मा पासून तर शेवटपर्यंत करीत असतो.त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी रामाचे नामस्मरण करून येणाऱ्या अडचणी व दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यामुळे प्रभूराम सर्वांच्या मनात, हृदयात,आकाश-पाताळ,पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिन,निसर्ग,वन्यप्राणी,मानव-जिवजंतु यांच्या मना-मनात वावरत असतो.त्यामुळेच जगातील इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक विदेशी नागरिकाची पहीली पसंत भारत असल्याचे दिसून येते.कारण भारतात सर्वच धर्मांच्या देवी-देवतांचा व थोरमहात्म्याचा वास आहे.त्यामुळे भारतवासी एकोप्याने राहतात.आज जगात भारत विश्र्व शांतीचे प्रतीक आहे हे फक्त प्रभूराचंद्रांच्या आदर्शामुळे.त्यामुळे प्रभूराचंद्राचे महत्त्व आणि त्यांची लीला हिंदू धर्माला ग्यात आहेच.

अयोध्येतील राममंदिर भारतीयांच्या मदतीने एवढे भव्य होणार आहे की संपूर्ण जगात ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यटनाला चालना देणारे ठीकाण होणार आहे.त्याचप्रमाणे सात अजुब्यातुन राममंदिर प्रथम क्रमांकावर राहील.त्यामुळे राममंदिर ते राष्ट्रमंदिर ही भुमिका सर्वांनीच अंगीकारली पाहिजे.त्याचप्रमाणे हिंदूसंस्कृती जोपासण्याकरीता देशातील प्रत्येक हिंदूनी नवनिर्माण अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामाचे चरन स्पर्श केलेच पाहिजे.भारतातील प्रत्येक धर्माच्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की श्रीराम सर्वांचे आहे व राहील. श्रीरामाने 14 वर्षे वनवास भोगला,वालीसारख्या अहंकारी शक्तीचा सर्वनाश केला,रूषि-मुनी,साधु-संत, गोरगरीब यांचे संरक्षण केले,रावनासारख्या असुर शक्तीचा नाश केला तेव्हाच रामराज्याची स्थापणा झाली व सत्ययुग प्रस्तापीत झाले आणि तेव्हापासूनच सर्वांच्या मनात प्रभूराचंद्राची धुंद गुंजतांना दिसते.तीच प्रतीकृती आज अयोध्येमध्ये साकार होत आहे हे हिंदू धर्माचे अहोभाग्यच म्हणावे लागेल.आज अयोध्येतील राम मंदिरमुळे “मन में राम,तन मे राम,घर-घर मे राम” या आवाजाची गुंज आपल्याला संपूर्ण भारतात ऐकायला व पहायला मिळत आहे.आजही जगात अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीची जोपासना केली जाते व हिंदू संस्कृतीचा इतिहास सुध्दा दिसून येतो.यामागचे मुख्य कारण म्हणजे श्रीरामांचे आदर्श आहे.श्रीरामांचा इतिहास आणि वास्तव भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पहायला मिळते. तेव्हाच प्रभुश्रीरामचंद्रांना मर्यादापुरुषोत्तम म्हटल्या जाते.

प्रभु राम सत्यतेचे प्रतीक आहे.त्याचे अनुकरण देशातील लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी स्वयंघोषित समाजसेवक यांनी जनसेवा करण्याची नितांत गरज आहे.कारण देशातील 98 टक्के राजकीय पुढारी अहंकारी वृत्तीचे असल्याचे दिसून येते.या कलयुगात राजकीय पुढारी समाजसेवे पेक्षा स्वतःची सेवा करण्यात गुंग(मग्न) असतात.”मु मे राम बगल में छुरी” अशा प्रकारची असुरी भावना त्यांच्यात दिसून येते.कारण गरीब व सर्वसामान्यांचे रक्त पीवुन आजचा राजकीय पुढारी “रक्तबीज” राक्षसाची भुमिका बजावीतांना दिसून येते.त्यामुळेच आज देशातील प्रत्येक राजकीय पुढारी करोडपती झालेला आहे.यामुळेच आज देशात महागाई, बेरोजगारी,भुकमरी,महागडे शिक्षण,शेतकऱ्यांच्या समस्या व आत्महत्यां यांनी जन्म घेतला आहे.मी रामनवमीच्या निमित्ताने देशातील संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी  यांना विनंती करतो की रामराज्याची संकल्पना साकार करायची असेल तर आपण वाममार्गाने कमवीलेला संपूर्ण संपत्तीचा त्याग करून सरकारच्या तिजोरीत जमा करावा किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणावा यातच खरे प्रभु श्रीराम यांचे दर्शन दिसून येईल.त्याचप्रमाणे भुकेलेल्यांना अन्न हा देवी-देवतांचा मुलमंत्र आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारला पाहिजे.राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार, गरिब व सर्वसामान्यांची लुटमार थांबवून आणि महागाई कमी करून समाजकार्य करावे यातच खरा प्रभु रामचंद्राचा आदर्श दिसून येईल व पुन्हा आपल्याला भारतात रामराज्य साकार करता येईल.जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होत नाही तोपर्यंत भारतात रामराज्य शक्य नाही.

याकरीता भ्रष्टाचारावर आळा व अहंकारी राजकीय पुढाऱ्यांच्या चल-अचल संपत्तीची कठोर चौकशी करून यांची संपत्ती जनकल्याणासाठी उपयोगात आणली पाहिजे. यातच आपल्याला रामराज्य खऱ्या अर्थाने दिसून येईल. आजचा राजकीय पुढारी स्वार्थी झाल्यामुळे  व यांच्यात असुरी शक्ती निर्माण झाल्याने देशात अनेक नवीन-नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे देशाच्या 135 कोटी जनतेला आज महागाईचा श्राप बसल्याचे दिसून येते.या असुरी शक्तीला संपवायचे असेल तर प्रभु रामचंद्राचे आदर्श सामोरं ठेऊन राजकीय पुढाऱ्यांनी समाजकार्य करायला हवे.तेव्हाच भारतात रामराज्य प्रस्थापित होईल.प्रभु श्रीरामचंद्र नेहमीच निसर्गाच्या वावरले आणि रहाले त्यामुळे त्यामुळे आज निसर्गाला वाचविण्यासाठी जबाबदारी आज संपूर्ण मानवजातीवर आहे.त्यामुळे रामनवमीच्या पावन दिवसांचे औचित्य साधून संपूर्ण रामभक्तांनी, सामाजिक संघटनांनी, प्रशासनाने व सरकारने आजच्या दिवसाला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला पाहिजे.यामुळे निसर्ग प्रफुल्लित होईल, प्राणीमात्रात आनंदाचे वातावरण निर्माण होईल,सर्वत्र हिरवळ दिसून येईल, शुद्ध हवा मिळेल, शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल व आपल्याला प्रत्येक पानात, फुलात,फळात प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन अवश्य होईल.कारण प्रभु रामचंद्रांचे खरे दर्शन आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यातच दिसून येईल.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.