दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्य भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अजित पवार यांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना संग्रामसिंह सावंत, विक्रम आबिटकर, भरत शेटके व इतर मान्यवर.

गारगोटी प्रतिनिधी – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत आणि युवानेते विक्रमसिंह आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवीरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा व जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. कै. अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलेले कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विकासासाठी दिलेले योगदान यांचे स्मरण केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, प्रशासनातील कार्यक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख निर्णय यांचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी गारगोटीचे उपसरपंच भरत शेटके, युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट, व्ही. जे. कदम सर, अजित आबिटकर, शहरप्रमुख रणधिर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोई, सुरेश सुर्यवंशी, पांडूरंग कांबळे, उपतालुका प्रमुख शहाजी देसाई, साताप्पा कल्याणकर, संदीप पाटील, शिवसेना विभागप्रमुख दयानंद आरेकर, युवराज सुर्वे, युवराज फगरे, सुनिल रेडेकर, विशाल वायदंडे, दीगंबर देसाई, ओमकार पाटील, सुशांत भाटले यांच्यासह शिवसैनीक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.