तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
आपल्याला स्वच्छता व सुंदरता जोपासण्याची जबाबदारी आज भारतातील अनेक शहरांना जी 20 ने दिली आहे.त्याचे काटेकोरपणे पालन होने अत्यंत गरजेचे आहे.कारण स्वच्छता व सुंदरता हि आरोग्य,पर्यावरण व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक व महत्वाची आहे.त्यामुळे जी 20 ने आपल्याला एक चांगला मार्ग दाखविला व संदेश दिला आहे त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.जी 20 चा एक भाग नागपूर सुध्दा आहे ही बाब नागपूरकरांनी लक्षात ठेवली पाहिजे.कारण नागपूर हे भारताचा केंद्र बिंदू आहे व व ज्या-ज्या ठिकाणी जी 20 च्या सभा किंवा बैठकी झाल्यात ते संपूर्ण ठिकाण जगातील विस देशांच्या लिस्टमध्ये आहे.त्यात नागपूर सुध्दा अग्रेसर आहे.जी 20 च्या माध्यमातून संपूर्ण नागपूर शहराला सौंदर्याचे स्वरूप होते आणि आहे. हीच सुंदरता टिकवून ठेवण्याची जबाबदारी संपुर्ण नागपूरवासी,प्रशासन व महाराष्ट्र सरकारची आहे.कारण एवढी सुंदरता व स्वच्छता कधीच कोणी पहाली नाही एवढे नागपुरचे सुशोभिकरण करण्यात आले होते.
जी 20 च्या माध्यमातून नागपूर शहरातील संपूर्ण भिंतीवर रंगरंगोटी करून पर्यावरण, प्राणीमात्रांची काळजी घेणे,खेळाबद्दल माहिती, आरोग्य,वृक्षारोपण इत्यादी अनेक प्रकार चित्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहचवीण्याचे काम आपल्या कलेच्या माध्यमातून व चित्राच्या माध्यमातून कलावंतांनी केले. नागपुरच्या सुंदरतेचा संदेश हा जागतिक पातळीवर सुध्दा गेलेला आहे ही बाब नागपुकरांनी लक्षात ठेवली पाहिजे.आपण विदेशी पाहुण्यांचे स्वागत मोठ्या आदरतीत्थाने आणि उत्साहाने केले. नागपूरची सुंदरता पाहुन विदेशी पाहूने भारावून गेले व आनंदी झाले.परंतु आज आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की ज्याप्रमाणे सरकारने नागपुरला सुशोभित केले तीच सुंदरता अनेक काळापर्यंत टीकुण ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आल्याचे मी समजतो.
जी 20 च्या माध्यमातून जागतिक पातळीवर केलेली नागपूरची ओळख याला कुठेही तडा जाणार नाही याची जबाबदारी प्रशासन व महाराष्ट्र सरकारने स्वीकारली पाहिजे.जी 20 च्या सुंदरतेचा एक भाग म्हणून आपल्याला नागपूर शहरात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे होर्डिंग्ज,बॅनर, भिंतीवर पोस्टर इत्यादी आपल्याला कुठेही दिसले नाही. याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारावी.मोठमोठे होर्डिंग्ज सुंदरतेला अडचणी निर्माण करीत असतात.त्यामुळे जी 20 च्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांनी धडा घेऊन यानंतर वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज किंवा बॅनर लागणार नाही याची जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे.कारण होर्डिंग्ज, बॅनरमुळे नागपूरच्या सुंदरतेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकते.
राजकीय पुढाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नियुक्ती, आगमन, स्वागत,सभा इत्यादी करीता सोशल मीडियाचा व वर्तमानपत्राचा वापर करावा यामुळे हा नागपूरातील संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाईलच व महाराष्ट्रातुन संपूर्ण भारतात जाईल.यामुळे होर्डिंग्जची पध्दत हळूहळू बंद करण्यास मोठी मदत होईल.कारण आपण पहातो की होर्डिंग्ज अनेकदा दुर्घटनांचे कारण सुध्दा बनले आहे.वाहचालकांचे अचानक होर्डिंग्जकडे लक्ष जाने आणि दुर्घटना होने अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे होर्डिंग्ज मुक्त शहर होने अत्यंत गरजेचे आहे.जी 20 च्या अनुषंगाने भारतातील अनेक शहरे निटनेटकी सजवीण्यात आली व सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात आले.हीच परिस्थिती संपूर्ण शहरांनी टीकवुन ठेवली पाहिजे.
यात मुख्यत्वे करून प्रशासन, नागरिक व सरकारने सजकता ठेवून स्वच्छता व सुंदरता जपली पाहिजे.जी 20 च्या निमित्ताने नागपूर शहराचे रूप पालटले आणि याचा मनसोक्त आनंद नागपूरसह विदर्भातील नागरिकांनी घेतला. मात्र काही उपद्रवी नागरिक किंवा तरूण आपल्या बेजबाबदार वागणुकीतून या सजावटीचा गैरवापर करत असल्याची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुंदरता व स्वच्छता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होवू शकतो. त्यामुळे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे की स्वच्छता व सुंदरता टीकवुन कशी ठेवता येईल याची जातीने काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.