|
ती संध्याकाळ आणि रात्र रोमांचक होती. सार्थकच्या अविनाश ठाकूर आणि सौ. श्रध्दा ठाकूर यांनी बीचवरच्या वाळूवरच आम्हाला टेबल, खुर्च्या टाकून दिल्या. समुद्र किनारा नयनरम्य दिसत होता. मध्यभागी दूरअंतरावर थांबलेल्या बोटी काही काळ दिसल्या. नंतर मात्र त्यांच्यावर असलेला लाईटचा प्रकाश रात्रभर आम्हाला साद घालत होता. डावीकडून उजवीकडे पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि त्याच्या लाटा कर्णमधूर वाटत होत्या. उजवीकडच्या वाड्या, वस्त्यांवरचे प्रकाश दिवे खुणावत होते. दूरवर एखादे जहाज दिसत होते. कोकणी मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेत सागराचे रुप मनात साठवित होतो. रात्री बारा वाजता समुद्र आमच्या पायाशी आला होता.पहाटे पाचलाच उठलोत. खिडकीतून चंद्राचा सोनेरी प्रकाश समुद्राच्या पाण्यावर हेलकावे घेत होता. विहंगम वाटत होते. काळोखात फोटो काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसहा वाजता चांगला फोटो मिळाला. सकाळचा चहा घेऊन बीचवर हुंदडण्याची मज्जा अनुभवली. अनेक माणसे मॉर्निंग वॉक करीत होते. खूप व्हिडीओ आणि फोटो काढले. अंघोळी करुन, नाष्टा करुन दर्शनासाठी वेळणेश्वर मंदिरात गेलो.
(अपूर्ण- उर्वरित पुढील भागात.. मागील भाग वाचण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा.) Tourism-पर्यटनः वेळणेश्वर (श्रीदेव महाविष्णू देवस्थान) Tourism-पर्यटनः वेळणेश्वर (श्रीदेव महाविष्णू देवस्थान) श्री धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य https://positivewatch.in/wp-admin/post.php?post=2646&action=edit Tourism-पर्यटनः वेळणेश्वर (श्रीदेव महाविष्णू देवस्थान)
–विशेष साैजन्य- जेष्ठ पत्रकार, लेखक |
ती संध्याकाळ आणि रात्र रोमांचक
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.













































































