लिंग भेदाला नकार आणि समानतेला करूया स्विकार
नाट्य खेळातून संदेश देत महिला दिन साजरा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुरूस्कूल गुफान मध्ये महिलांनी केला निर्धार
गुरुस्कूल गुफानने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या WWO वल्ड वुमेन्स ऑर्गनायझेशनच्या ८ मार्च २०२३ च्या संकेतानुसार प्रा. देवदत्त पाठक यांनी रंगमंचीय खेळांची नाटय कार्यशाळा घेतली. त्यात स्त्री हक्क, स्वातंत्र्य, ब्रेड बटर (रोजगार), घरातील व कामाच्या ठिकाणाचे स्वास्थ्य व शांती, शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित रंगमंचीय खेळ घेऊन नाटय सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ समाज नायिका कै. सरोजिनी नायडू यांनी भारतात प्रथमच केलेल्या स्त्रीच्या विशेष अस्तित्व संकल्पनेची मांडणी पाठक सरांच्या रंगमंचीय नाट्यखेळात होती. जगण्यासाठी विशेष क्षमता व कौशल्यावर भर असलेल्या रंगमंचीय खेळांनी आम्हाला स्त्री जन्म शाप नाही तर वरदान अशी जाणिव करून दिली, अशी भावना अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी सर्व महिलांनी’ घाई’ आणि ‘स्त्री नाहीतर माणूस’ या विषयांवर उत्स्फूर्त प्रसंग नाट्य दर्शन सादर करून आपल्या कला कौशल्याला सर्वांसमोर दाखवण्याचे धाडस केले. सीमा जोगदनकर (सह सचिव) यांनी स्वागत केले, तर मिलींद केळकर (सचिव) यांनी प्रास्ताविक केले आणि समाज कार्यकर्त्या उषा देशपांडे यांनी आभार मानले.