शिवाजीराव देशमुख व आण्णाभाऊ साठे स्मारकाना अर्थसंकल्पात ४५ कोटींवर तरतुद
शिराळा (जी.जी.पाटील)
विधानपरिषद माजी सभापती,डोंगरी विभागाचे शिल्पकार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांचे कोकरूड ता.शिराळा येथे भव्य स्मारक उभारणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच वाटेगाव ता.वाळवा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणीसाठी 25 कोटी रुपया च्या निधी ची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली.अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे कोकरूड तालुका शिराळा या त्यांच्या मूळ गावी भव्य स्मारक उभारावे अशी मागणी शिराळा व वाळवा तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची होती.त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या मागणीला यश आले असून यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 कोटी रुपये निधीची तरतूद स्मारक उभारण्यासाठी केले आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील,आ. प्रवीण दरेकर,आ.प्रसाद लाड,भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
वाटेगाव ता.वाळवा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणीसाठी अर्थसंकल्पामध्ये 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वाटेगाव येथे त्यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. अशी माहिती देशमुख यांनी दिली.