शब्दांकन – विनायक जितकर
मा. दिवंगत खा. सदाशिवराव दादोबा मंडलिक आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…!
माझ्या मनात हौशा, मी आणि म्हातारा बैल असं त्रांगडे सुरू झालं. प्रचारात इतर केक गोष्टी घडत होत्या. पण हा म्हातारा बैल’ शब्दप्रयोग मात्र अनेक शेतकऱ्यांच्या काळजाचा लचका तोडत होता. झालं असं की, ज्या उमेदवाराच्या बाजूला जिल्ह्यातले मापून हजार नेते आणि दोन हजार चिल्लर नेते, खुर्दा वेगळा असे सगळे होते, त्या उमेदवाराचा पराभव झाला आणि म्हातारा बैल विजयी झाला. शेतकऱ्यांच्या भावनांना, प्रतीकांना धक्का लागला की, काय घडू शकतं, याचं प्रत्यंतर इथल्या शेतकऱ्यांनी दिलं. निकालानंतर काही गावात म्हातान्या बैलांच्या मिरवणुका काढल्या. या निकालाचा कोणी कसाही अन्वय लावावा. मला मात्र या म्हाताच्या बैलानं राजकारणाकडं नव्यानं पाहायला शिकवलं.
बालपणी हालाकीची परिस्थिती, अनेक राजकारणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात व वडिलोपार्जित वारसा चालवतात,पण हा माणूस त्याला अपवाद ठरेल. जेव्हा जेव्हा हा माणूस निवडणूकीसाठी आपला अर्ज द्यायचा तेव्हा खिशात तर पैसा नाही. मग लोकवर्गणी काढून त्या पैशातून निवडणूकीच डिपॉसीट द्यावं लागायचं. म्हणजे समाजाविषयी असणारी नाळ किती घट्ट जोडली असावी याचा अंदाज लागून येतो.अगदी शून्यातून त्यांनी आपली कारकीर्द चालू करून मुरगुडच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीने कधी काळी दिल्ली हादरून सोडली. तब्बल चार वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार तेही कोल्हापूरचा…
मला राजकारणातल फारस काही उमजत नाही. पण ‘खासदार’ सारख्या पदाला ‘एकटा जीव सदाशिव’ अपक्ष निडवून येन म्हणजे काय खायची गोष्ट नाही.’मोडेन पण वाकणार नाही’ हे प्रण घेऊन आयुष्यभर शाहूंराजांच्या पुरोगामी विचाराने प्रेरित होऊन समाजकार्य शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवल.
आता काहीजण सहज प्रश्न विचारतील. अशी किती मतं या शब्दप्रयोगानं फिरली असतील?… कुणाला माहीत आहे म्हातारा बैल ?… आता शेती यंत्रावर चालते. कुठं आहेत बैल?… बैल इतिहासजमा झाला. त्याचं इतकं कौतुक कशाला ?… असलं काही वाचून आमचा काय फायदा ?…. खरं आहे त्यांच्या दृष्टीने हे निरर्थकच! ह्या माणसाबद्दल जेवढे पोवाडे गावे तेव्हडे कमी आहेत कारण ह्या व्यक्तिमत्वात कार्य आभाळाएवढं….