WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION-संपूर्ण आयुष्यभर जनतेचा हमाल बनून सेवा करू

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन 0लाखावर उपस्थितांच्या गर्दीत मिरवणुकीने भरला उमेदवारी अर्ज
कोल्हापूर: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापूरापुढे मी नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालीत आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही. सहाव्यांदा आमदारकीची संधी द्या, संपूर्ण आयुष्य जनतेचा हमाल बनून सेवा करू असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
अर्ज भरण्यापूर्वी एक लाखावर लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीनंतर मंत्री मुश्रीफ बोलत होते
अकराच्या सुमारास मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले. आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली.  झेंड्यांनी आणि बॅनरनी सजवलेल्या ट्राॅलीतून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय दादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. 
एक लाखाहून अधिक संख्येने जमलेल्या गर्दीत महिला आणि वृद्ध महिलांचाही सहभाग लक्षवेधी होता. हि मिरवणूक शिवाजी पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेतून खर्डेकर चौक या मार्गावरून निपाणी वेशीपर्यंत पोहोचली. भर उन्हाच्या तडाख्यात अलोट गर्दीत आणि अमाप उत्साहात ही सभा बरोबर एक वाजता सुरू झाली, आणि दोन वाजता संपली. या कार्यक्रमास शहरातील या ऐतिहासिक मिरवणुकीने आजपर्यंतच्या मिरवणुका आणि गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले. अगदी निपाणीकडील कमानी पासून ते कागल कमान आणि त्याच्याही पुढे राष्ट्रीय महामार्ग पर्यंत गर्दीच-गर्दी होती.

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघात लोकभावनेची कदर करून बांधलेली साडेसातशेहून अधिक मंदिरे असतील, याच्याही पलीकडे जाऊन गेल्या वीस पंचवीस वर्षात कागल तालुक्यातील गटबाजीला मूठमाती देऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे आलेला माणूस माझ्याकडे जनतेने दिलेली शक्ती आहे या भावनेने येतो, तेवढ्याच प्रमाणिक भावनेने मी त्यांचे काम करत असतो, विकासाचं राजकारण याच्यापेक्षा आणि काय असतं हे तुम्हीच मला सांगा.
माजी खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे आमदार-खासदार म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांनी मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी विकासकामांसाठी खेचून आणला आहे. या कामांच्या जोरावरच विकासाचा गाडा घेऊन प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने अर्ज भरणार आहेत. महायुतीची अभेद्य फळी त्यांच्या पाठीशी उभी असून मुश्रीफ यांना निवडून आणण्यासाठी आमची मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना सर्वात पुढे असेल. 
माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, मी दूधगंगा, वेदगंगा आणि अनेक नदी – नद्यांना आलेले पूर पाहिले आहेत. आज कागलमध्ये जमलेला लोकगंगेचा महापूर पहिल्यांदाच बघितला आहे.  त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून २३ तारखेला कागलात गुलाल उधळायला येऊ.
आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्लीतील दलित बांधवांना दिलेल्या जमिनी समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्या आणि हा माणूस आमदारकीचे स्वप्न बघत आहे अशा व्यक्तीला रोखणे गरजेचे आहे.  मिळालेल्या मंत्रिपदाचा माज, मस्ती न करणारा सर्वसामान्यांमध्ये नेहमी मिसळून राहणारे, गोरगरिबांची कामे करणारे मंत्री हसन मुश्रीफ हे एका बाजूला आहे.  निवडणुकीपर्यंत आपण सर्वांनी जागरूक आणि जपून राहणे गरजेचे आहे.
गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मत आणि मत गोळा करूया, विरोधकांकडे बूथ लावायलाही माणूस शिल्लक राहिला नाही पाहिजे. मंत्री मुश्रीफांचा विजय असा लक्षवेधी करूया, की विरोधकांनी पुन्हा लढण्यासाठी डोकेच वर काढले नाही पाहिजे.
.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.