WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION माझं सगळं आयुष्य मतदार संघासाठी समर्पीत – प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मुंबई मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद… महिलांची लक्षणीय उपस्थिती…

गारगोटी – माझं सगळं आयुष्य मतदार सघासाठी समर्पित केले आहे. मतदारसंघाचा विविध माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू असुन पर्यटन दृष्ट्या महाराष्ट्रात नव्हे तर देशातुन पर्यटक राधानगरी मतदारसंघ पहावयास येतील पण विरोधकांना विकास दिसत नाही, ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांनी एक काम केलेले दाखवावे असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. मुंबई -नायगाव येथील यादव-गवळी समाज सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते, कार्यक्रमास बिद्री चे माजी संचालक नंदकिशोर सुर्यवंशी सरकार, दत्ताजीराव उगले, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर प्रमुख उपस्थित होते.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की, मतदार संघातील प्रत्येक प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भगीरथ सहकार्यामुळेच मतदार संघातील बहुतांशी प्रकल्पांना निधी मिळाला असुन संपूर्ण मतदार संघ पाणीदार झाला आहे. मतदार संघातील लोकांना तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता आपले प्रयत्न सुरू आहेत. तर वाडी-वस्त्यांवर रस्ते, वीजेच्या सोयीमुळे मुलभुत सुविधा उपलब्ध करण्यात यशस्वी झालो आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मुंबई शहरातच मिळण्यासाठी बैठका घेतल्या त्याचा सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरू असून पुढील काळात गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच हॉटेल कामगारांचे स्वतंत्र महामंडळ व्हावे यासाठी पाठपुरावा केला असून ते महामंडळ मान्यतेच्या अंतिम टप्यात आहे. त्यामुळे इमारत बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर सर्व सुविधा या हॉटेल कामगारांना उपलब्ध होणार आहेत. तसेच सुरक्षा महामंडळ अंतर्गत सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील पाठपुरावा केला आहे. माझ्या विजयात तुमची साथ महत्वाची आहे. मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आजची तुमची उपस्थिती हे माझ्यावर असलेले प्रचंड प्रेम दाखवते. यापुढे देखील मतदार संघाच्या विकास अधिक गतिमान करण्यासाठी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला काम करण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिपक पाटील (राशीवडे) म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांचे विकासात्तक काम पाहून माझं मत परिवर्तन झाले आहे. पै-पाहुण्यांच्या राजकारणाला राधानगरीची जनता कंटाळली असून येणाऱ्या निवडणूकीमध्ये आमदार आबिटकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र यादव ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवडकर म्हणाले आमदार आबीटकर राज्यात उच्चांकी मतांनी विजयी होतील. गुरूनाथ दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रशांत भावके, जगन देसाई, कांता शेठ, विश्वास देसाई, बापूसाहेब चिले, दीपक वरंडेकर, नामदेव पाटील मोहन पाटील उत्तम गोजारे, तुकाराम देसाई, सागर पाटील रमेश हिरुगडे राजेंद्र वरंडेकर विजय गुरव, कृष्णा पाटील, नामदेव सुतार आदीसह मुंबईतील चाकरमानी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रदीप वरंडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप धम्मरक्षित यांनी केले. आभार उत्तम गोजारे यांनी मानले.

ये तो ट्रेलर है…
पुणे, मुंबई येथील चाकरमानी यांच्या सभेतील ईर्षा, उत्साह आणि उच्चांकी गर्दी ही आबीटकर यांच्या विजयाची नांदी आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे तुकाराम देसाई (मेघोलीकर) यांनी म्हणताच उपस्थितांनी शिट्या आणि टाळ्यांच्या गजराने सभागृह दणाणून सोडले.

मुंबईत जल्लोषी स्वागत…
रविवार मुंबईत मेगा ब्लाँक होता त्यामुळे लांबलाबुन येणारे राधानगरी भुदरगड आजरा वासीय यांनी त्रासाचा कोणत्याही विचार न करता मेळाव्यास विक्रमी उपस्थिती लावली, आमदार आबीटकर येताच महिला लेझीम पथकासह सर्वानी जल्लोषी स्वागत केले विशेष म्हणजे रात्री आकरा पर्यंत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या रांग लागल्या होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.