WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

२०२४ मध्ये सत्ता आल्यावर विरोधकांच्या विरोधात ज्याप्रकारची पावले उचलली गेली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल – शरद पवार

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कुणी काय म्हटले हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे…

दिल्ली – २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल असा विश्वास व्यक्त करतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांना दुर करून विरोधकांच्या विरोधात ज्याप्रकारची पावले उचलली गेली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. ज्या लोकांनी जनतेला कमिटमेंट करुन त्यांचे मतदान घेऊन चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांना किंमत द्यावीच लागेल. राजकीय स्थिती बदलेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या हातात महाराष्ट्रातील जनता सत्ता देईल असा जबरदस्त विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

पार्टीला संपवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आता पक्षाला मजबूतीने उभे करणे आणि चांगल्या स्थितीत आणणे ही मानसिकता आमच्या सर्व लोकांची होती. आजची बैठक आमची उमेद वाढवायला महत्त्वाची आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. कुणी काय म्हटले हे मला माहीत नाही. एक गोष्ट नक्की आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. दुसर्‍या कुणी स्टेटमेंट दिली त्यात कोणतेही तथ्य नाही असा टोलाही शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. आजची वर्कींग कमिटीची बैठक संविधानाला धरून होती. त्यामुळे कुणी काही म्हटले असेल तर त्यात कोणतीही खरी गोष्ट नाही.

सुप्रीम कोर्टाचा जो निवाडा आला आहे त्यात विधीमंडळ सदस्यांची संख्या हा मेजर इश्यू नाही. मात्र कुणाला पंतप्रधान बनायचे तर कुणाला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी खिल्ली उडवली. आमचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते निवडणूक आयोगाला सांगणार आहे. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर दुसऱ्या यंत्रणेकडे जाण्याचा विचार करु मात्र ही वेळ आमच्यावर येईल असे मला वाटत नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असेही शरद पवार म्हणाले. जिथे लोकांचे समर्थन आहे तिथे काय स्थिती असते हे मी पाहिले आहे आणि ज्याप्रकारे महाराष्ट्रात युवकांचे समर्थन मिळत आहे ते पहाता मला त्याचा आनंद आहे असेही शरद पवार म्हणाले.

आज भाजपचे केंद्रसरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर जागोजागी करत आहे. ठिक आहे अकरा महिने निवडणूकीला आहेत त्यानंतर देशातील स्थिती बदलेल त्यावेळी त्यामध्ये काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ही आमची टॉप प्राथमिकता असेल असेही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. दरम्यान या राष्ट्रीय वर्कींग कमिटीच्या बैठकीत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे आणि कोहली यांना वर्कींग कमिटीतून निलंबित करण्याचा ठराव आज करण्यात आला.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी