केडीसीसीच्या फलकावरून काँग्रेसचे संचालक गायब राजकीय उलथापालथीनंतर डिजिटल वॉर
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे कट्टर समर्थक असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजप शिवसेना यांच्याशी युती केली. यानंतर कागल मतदार संघातील मुश्रीफ यांचे पारंपारिक विरोधक भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे नाराज असल्याची चर्चा होती. गुरुवारी समरजीत सिंह घाटगे यांनी कागल येथे झालेल्या सभेत आपण भाजप सोबतच राहणार असल्याचं सांगितलं मात्र मुश्रीफ यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मार्जिन ने विजयी होणार असं म्हणत मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला. आज मंत्री मुश्रीफ यांचं कोल्हापुरातील ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आलं.
मात्र या ठिकाणी झळकत असलेल्या फलकांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं. या ठिकाणी समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी लावलेल्या फलकावर निष्ठा जनतेवर पक्षावर राजेसाहेब आमचे आमदार असा असे लिहिण्यात आलेला आहे या फलकाच्या खालोखाल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मंत्री मुस्लिम यांच्या अभिनंदनचा फलक लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या फलकावरून राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे जिल्हा बँकेतील संचालक यांचे छायाचित्र गायब झाले आहेत.फक्त मंत्री मुश्रीफ यांच्याच गटातील संचालकांचे छायाचित्र झळकत आहेत.
त्यामुळे मुश्रीफ विरुद्ध घाटगे आणि जिल्हा बँकेच्या संचालकांनी लावलेले फलक चर्चेचा विषय ठरला. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला कोणत्याही फलकावर आपल्या छायाचित्राचा वापर न करण्याची तंबी दिली होती. मात्र कोल्हापुरात मुस्लीम यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या एका कमानीवर मुश्रीफ समर्थक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांचा फोटो लावला होता. या कमाने ने देखील सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं.