WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन – समरजित घाटगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

२०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपकडूनच लढणार…

कागल – अजित पवार यांनी रविवारी घेतलेल्या शपथविधीनंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाराज असल्याची चर्चा होती. चार दिवसांपासून ते नॉट रिचेबल असल्याचीही चर्चा होती. आज कागलमध्ये मेळावा घेऊन समरजित घाटगे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपकडूनच लढणार. तसेच भाजपच राज्यात निवडणूक जिंकणार असा निश्चय भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज नाराजीनाट्यावर पडदा टाकताना भाजपसोबत असल्याची टीका केली. मला घालवण्याची घाई कशासाठी? असे सांगत समरजितसिंह घाटगे यांनी भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. माझे राजकीय गुरू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत, पक्षाच्या निर्णयासाठी माणूस मुख्यमंत्री असलेला उपमुख्यमंत्री झाला. हेळसांड, कुचंबणा झाली म्हणून मी गुरू बदलणारा नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भाजपमध्येच राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. कागलमध्ये ज्या घडामोडी झाल्या, कोण उपमुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. भाजप रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सोडणार नसल्याचे सांगत घाटगे यांनी मुश्रीफांच्या मंत्रिपदानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पक्षनिष्ठा काय असते मी कागलमधून दाखवून देईन, असेही ते म्हणाले. अजित पवार यांनी आम्हाला पुरोगामीचं प्रमाणपत्र दिलं. संपूर्ण राज्याचं लक्ष कागलच्या परिवर्तनासाठी लागलं आहे. आज आपल्या विजयाचे भुमीपूजन झालं आहे. आमदारकी लढणार आणि मोठ्या मार्जिननं काढणार आहे. जे झालं आहे ते करेक्ट झालं आहे, 2024 साली डबल मार्जिननं जिंकणार आहे, कागलचा कोंढाणा परत घ्यायचा असे म्हणत त्यांनी रणशिंग फुंकले. समरजित म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून म्हटलं मी पुन्हा येईन. या सगळ्यानंतर मला अनेक फोन आले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मेसेज करून भेटण्यासाठी बोलवलं. माझं पुनर्वसन करण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी गेलो नव्हतो. जो कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला, सपोर्ट दिला त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन. या दोन दिवसात राज्यातील सगळ्या पक्षांचे फोन आले, पण बुद्रुकसाठी मी पार्टी का सोडायची?

मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने समरजित काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी भाजपसोबत राहणार असल्याचे जाहीर करताना मुश्रीफांशी सुद्धा दोन हात करण्याची भूमिका जाहीर केली आहे. घाटगे यांनी सांगितले की, काही तासांच्या निरोपावर हजारो संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. मी काय निर्णय घेणार हे माहिती नसताना देखील मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित राहिले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.