कराडः कराड तालुक्यातील शिंदेवाडी-कोळेवाडी येथील ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंग यात्रा, जलदिंडी, वृक्षदिंडी व मातीपूजन माेठ्या उत्साहात आणि धार्मिक पद्धतीने नुकताच पार पडला. याला ग्रामस्थांकडून माेठा प्रतिसाद मिळाला. अनाेख्या पद्धतीने झालेली श्री ज्याेतिर्लिंग देवाची यात्रा ही न भुताे न भविष्यताे अशीच हाेती.
दि. १२ व १३ राेजी कराड तालुक्यातील शिंदेवाडी- कोळेवाडी, येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणेच यंदाही पारंपारिक पद्धतीबराेबरच माेठ्या जल्लाेषात साजरी हाेताना, प्रदूषणाची, पर्यावरणाची जनजागृती तसेच शेतीविषयी आस्था निर्माण करण्याचा एक प्रयत्न या यात्रेनिमित्त ग्रामस्थ व प्रशासनाने केला आहे. या श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रेचे औचित्य साधत जलदिंडी, वृक्षदिंडी, माती पूजन करण्यात आले. यावेळी महिला मंडळ, ग्रामस्थ, युवक, वारकरी संप्रदायाचे लाेकांनीही लक्षणीय उपस्थिती दाखवत, या अनाेखा कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
मास्कचा वापर करा,घाबरू नका..एच3एन2 विषाणू पसरत आहे काळजी घ्या!
सदर यात्रेची सांगता निसर्ग संवर्धन आणि हवा जमीन पानी माती ह्या दैवतांचा आदर ठेऊन व युवा क्रिकटप्रेमीं चा खेळाडू वृत्तीने झाली. या अनाेख्या उत्सवाची संपूर्ण दशक्राेतीत स्वागत करण्यात आले. आधुनिकतेच्या युगात महिलांचे तसेच युवकांचे महत्व माेठे असून, त्यांच्या विचाराला, कार्याला प्रेरणा दिली पाहिजे असा सूर उपस्थितांमधून काढण्यात आला.
शिंदेवाडी यात्रा कमिटी, महिलावर्ग आणि युवकांचे स्वागत होत आहे.