मुंबई : राज्यपाल यांच्याहस्ते रमेश बैस यांच्याहस्ते ‘सी. एस. आर. हिरो’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. संजय डी. पाटील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.
कसबा बावडा वार्ताहर : डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
“नवभारत”च्यावतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. यावर्षी मुंबईतील राजभवन येथे बुधवारी झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘एक्सलंस इन सी. एस. आर. अॅक्टीव्हीटी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील उपस्थित होत्या. |
माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी कसबा बावडा येथे 1984 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या 38 वर्षात या ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 7 विद्यापीठे, 162 संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रुपच्या विविध महाविद्यालयामार्फत मेडिकल, पॉलीटेक्निक, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आदी विविध शाखामधील शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण पोहचवण्यात महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. ‘नवभारतच्या’ वतीने यापूर्वी ‘जागतिक व भारतीय पद्धतीचे उत्कृष्ट शिक्षण देणारी व सर्वात वेगाने वाढणारी राज्यातील शैक्षणिक संस्था’ म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपचा गौरव करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम आमच्या सर्वच संस्थांकडून अव्याहतपणे सुरु आहे. कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक स्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याना अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त उत्तम शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
-डॉ. संजय डी. पाटील
अध्यक्ष, डी वाय पाटील ग्रुप