WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा – डॉ. संजय डी. पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी वाय पाटील अभियांत्रिकी मध्ये नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत…

कोल्हापूर – गेल्याच्या 40 वर्षांपासून डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय उत्तम अभियंते घडवून देश सेवेमध्ये योगदान देत आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्यासाठी आम्ही कटीबध्द पद्धत आहोत. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिळवलेल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर समाजासाठी करावा असे आवाहन डी. वाय. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ पालक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ संजय डी.पाटील म्हणाले, डी. वाय.पाटील शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेवून यशस्वी झालेले अनेक विद्यार्थी आज देश -परदेशात नोकरी व्यवसाय करत आहेत. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उत्तम अभियंते घडविण्यासाठी आमचे सहकारी, प्राध्यापक, कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन वर्षापासून डॉ. डी. वाय.पाटील ग्रुपने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सौ शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. यावर्षी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सात विद्यार्थ्यांना ही योजना लागू करत आहे. या सर्वांना यावर्षीची फी माफ करत असल्याची घोषणा डॉ. संजय डी पाटील यांनी यावेळी केली.

प्रारंभी डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील , विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश व महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम उपक्रमांची माहिती दिली.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय.ग्रुपच्या 40 वर्षाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढवा मांडला. ते म्हणाले, 40 वर्षापूर्वी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी कसबा बावडा येथे शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले. डॉ. संजय डी पाटील, आमदार सतेज डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील आणि पाटील कुटुंबीयांच्या अथक परिश्रमातून आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. डॉ. डी वाय पाटील ग्रुपने अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती केलीय. डी वाय पाटील ग्रुपने केवळ चांगले डॉक्टर, इंजिनियर्सच नव्हे तर यशस्वी नागरिक घडवले आहेत. यावर्षी कर्नाटक, आंध्रप्रदेश, हरियाणासह 7 राज्यातील विद्यार्थ्यानी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

यावेळी हरियाणा येथून आलेले पालक व माजी विद्यार्थी राजीव मित्तल, कुंभोजकर यांच्यासह विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करत डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. सुत्रसंचलन डॉ. राधिका ढणाल, प्रा. सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. नवनीत सांगळे यांनी मानले. यावेळी रजिस्ट्रार डॉ एल व्ही मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा रविंद्र बेन्नी, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.