WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

1445.97 कोटी रुपयांच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यास व 259.59 कोटी रुपयांच्या श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

कोल्हापूर – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण 5503.69 कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे आज पार पडली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे 1445.97 कोटी व 259.59 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.

या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा (अपर मुख्य सचिव – नियोजन विभाग) उपस्थित होते.

या मंजुरीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकास कार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. हे सर्व राज्यातील भाविकांसाठी आनंददायक ठरणार आहे.’ प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाच्या प्रलंबित विषयांत विशेष लक्ष घालून प्रयत्न सुरू केले आहेत. विकास आराखड्या बाबतही त्यांनी आराखडा तयार करण्यापासून मंजुरी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिल्याने आज श्री. अंबाबाई विकास आराखडा व श्री. क्षेत्र जोतिबा परिसर विकास आराखडय़ास मंत्री मंडळाची मान्यता मिळाली आहे.

श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विकास आराखड्यात:
• मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन
• किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन
• मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन
• दर्शनासाठी अच्छादित मंडप
• स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
• लॉकर्स, शू स्टँड
• भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास या कामांचा समावेश आहे.

श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात:
• श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन
• पायवाटांचे जतन
• कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन
• भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र
• अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती
• घनकचरा व सांडपाणी प्रकल्प
• केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण
• यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास या कामांचा समावेश आहे.

या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंते प्रशांत आयरेकर व रोहित तोंदले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.