जैन कलार युथ फाउंडेशन तर्फे 2019 पासून जैन कलार प्रीमियर लीगची सुर्वात झाली आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येते.यात संपूर्ण महाराष्ट्रातील जैन कलार समाजाचे युवा वर्ग मोठ्या उत्साहाने भाग घेतात.यामुळेच समाजाची जडणघडण दिसून येते.टुर्नामेंटचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील युवकांना एकत्र करणे,संघटित करणे व खेळाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ ठेवणे हाच मुख्य उद्देश असतो.2023 चे टुर्नामेंट ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालय, नागपूर येथे आयोजित केलेले आहे.
हे टुर्नामेंट दिनांक 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत चालेल.या टुर्नामेंटमध्ये वेगवेगळे बक्षीस सुध्दा ठेवण्यात आलेले आहे.हे बक्षीस समाजातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यात प्रथम पुरस्कार 51 हजार रुपये, व्दितीय पुरस्कार 21 हजार रुपये,मॅन ऑफ द सिरिज 5 हजार रूपये आणि मॅन ऑफ द मॅच अशाप्रकारे वेगवेगळे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.या टुर्नामेंटला सफल बनविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजारोंच्या संख्येने समाज बांधव या टुर्नामेंटचा अवश्य लाभ घेतील अशी अपेक्षा आहे.
या टुर्नामेंटला सफल बनविण्यासाठी कपिल समर्थ, विरेष दूरुगकर, वैभव सोनवणे, राहुल शेंडे, निखिल हरडे, अक्षय तिडके,सूरज बन्सोड,अक्षय खानोरकर,महेश तिडके, राकेश मासुरकर, सचिन दहिकर,कुणाल घोसेकर,भावेश होरे,पारस मोरघरे,मिलिंद खानोरकर,गौरव हरडे,संकेत पलांदुरकर,अनुप हरडे, राकेश शिरपुरकर,संदीप शिरपपुरकर, प्रलोक मोरघरे, सौरभ समर्थ हे सर्व युथ फाउंडेशनचे पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे व यांना साथ मिळत आहे जैन कलार जेष्ठ नागरिक मंडळाची.त्यामुळे जैन कलार समाजाच्या युवकांना आव्हान करण्यात येते की क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभाग घेऊन संघटीत व्हावे.
संपर्क -रमेश कृष्णराव लांजेवार,(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) जैन कलार समाज युथ फाउंडेशन सदस्य मो.नं.9921690779, नागपूर.