CRIME- दामदुप्पट मिळतील म्हणून दिड कोटी घालवलं…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर: दहा महिन्यात दाम दुप्पट पैसे मिळतील म्हणून वेळोवेळी भरल्या पैशांमधून ट्रेडिंगचा प्रकार करत तब्बल दीड कोटी ला फटका बसून, आपली फसवूनक झालेचा प्रकार समोर आला आहे. 20 टक्के परताव्याने दहा महिन्यामध्ये दाम दुप्पट पैसे करून देऊ असा विश्वास दिल्यामुळेच ही फसवणूक झाल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
या फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी धनाजी तुकाराम खोत (रा. सावरवाडी तालुका करवीर, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. , यात आणखी पाच जण संशयित असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेची फिर्याद प्रदीप प्रकाश दुग्गाणी( वय ३२, रा. मारुती मंदिर, उजळाइवाडी, कोल्हापूर)यांनी दिली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की एप्रिल 2023 पासून 6 जुलै 24 अखेरपर्यंत सेन्स ऑप्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या कंपनीच्या माध्यमातून फिर्यादी प्रदीप प्रकाश दुग्गानी याने संशयित आरोपी धनाजी तुकाराम खोत याला वेळोवेळी पैसे दिले. वर्षभरामध्ये सुमारे एक कोटी 60 लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपी धनाजी खोत याने हे पैसे ट्रेडिंग मध्ये गुंतविले. दहा महिन्यामध्ये दाम दुप्पट पैसे करून देऊ असा विश्वास फिर्यादी प्रदीप दुगानी याला दिला, मात्र सातत्याने मागणी करूनही खोत पैसे देण्याचे टाळत आहे. हे समजल्यानंतर आपली फसवणूक झालेचे लक्षात आलेनंतर, दुग्गनी यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली, अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.