श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले रोजगाराचे केंद्र…

गारगोटी प्रतिनिधी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय, पाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय, पाल (ता. भुदरगड) येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तथा आबिटकर नॉलेज सिटीचे अध्यक्ष अर्जुन आबिटकर, भुदरगड पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, जिल्हा परिषद सदस्य, भुदरगड व राधानगरी पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा रोजगार मेळावा समन्वयक संजय पेंडसे, मेघा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील देसाई, विसडम फाउंडेशनचे संस्थापक अजय मस्के, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, जिल्हा उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, गारगोटी हायस्कूलचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, विविध कंपनीचे उद्योजक, प्रतिनिधी, शासकीय महामंडळांचे व्यवस्थापक, श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती व पालक तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र, कोल्हापूर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मेळाव्यात एकूण 32 उद्योजकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये 2 हजार 867 रिक्त पदांचा समावेश होता. तर या मेळाव्यास 991 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामधून 942 उमेदवारांची मुलाखती पार पडल्या होत्या. यामधून 467 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. तर 131 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या मेळाव्यात १० वी, १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा व सर्व शाखांतील पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेतला. तसेच तरुणांनी स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यासह इतर विविध महामंडाळांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तथा आबिटकर नॉलेज सिटीचे अध्यक्ष अर्जुन आबिटकर, जिल्हा रोजगार मेळावा समिती समन्वयक संजय पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी या मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्ज्वलन, वंदे मातरम व राज्यगीताने झाली. या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. उमेश पाटील यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.