तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापुरातील बहुचर्चित मोक्का केस मधील आरोपीना तब्बल पाच वर्षांनी जामीन मंजूर
कोल्हापूर : एप्रिल २०१९ मध्ये प्रक्षिणार्थी पोलीस अधीक्षक यांच्या पथकावर यादव नगर, कोल्हापूर येथे मटक्याच्या कारवाई करताना हल्ला झाला होता त्यानंतर, पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून ४४ जणांनावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. राज्यातील आतपर्यंतची मोक्याची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. मटका धंद्यातील अनेक बड्या धेंड्यावर ह्यात कारवाई झाली होती. ही कारवाई म्हणजे पोलिसांनी आपली सर्वस्वी प्रतिष्ठापणाला लावली होती.
बहुचर्चित शमा मुल्ला केस मध्ये तब्बल पाच वर्षानंतर कोल्हापूर कोर्टाकडून आरोपी राकेश अगरवाल आणि आरोपी जितेंद्र गोसालिया यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दि. ०३जून रोजी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला. सरकारी पक्षातर्फे या जामीन अर्जास जोरदार विरोध करण्यात आला होता. परंतु, आरोपीचे वकील सतिश कुंभार व भारत सोनूले यांचा युक्तिवाद योग्य ठरवत न्यायालयाने आरोपीस ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सदर आरोपीतर्फे ऍड. सतिश कुंभार, भारत सोनूले , सारंग कुराडे यांनी काम पाहिले तर प्रीती देवर्डेकर, सरोज देसाई यांचे सहकार्य लाभले. यावेळी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दोन्हीकडील युक्तिवाद बराचवेळ ऐकून घेतला. त्यानंतर हा निकाल देण्यात आला.
राज्यभरात चर्चेत असलेला कोल्हापूरचा मोका कारवाई विषय
सम्पूर्ण जिल्ह्यात चर्चा, सदर आरोपींनी या केसमध्ये आजपर्यंत जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय तसेच सुप्रीम कोर्टात प्रयत्न केले होते. तिथे आरोपीवर मोकका अंतर्गत झालेली कारवाई कायदेशीर असलेचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. त्यामुळे या आरोपींना जामीन मिळणार की नाही, या निर्णयाकडे पोलीस यंत्रणेसह जिल्ह्याचे लक्ष लागून होते. परंतु ,आरोपीचे ऍड सतीश कुंभार व भारत सोनूले यांनी न्यायव्यवस्थेसमोर वस्तुनिष्ठ अभ्यास आणि सुयोग्य मांडणी केली. बराच युक्तिवाद व पुरावे तपासले नंतरच न्यायालयातच आरोपी यांना जामीन मंजूर झाला. यामुळे, न्यायालयीन परिसर तसेच वकील वर्गात सर्वत्र या मोक्का अंतर्गत झालेल्या कारवाईनंतरचा जामीन मंजूर हा चर्चेचा विषय ठरला.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.