तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर(प्रतिनिधी) – आजीवन कारावास तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा असलेल्या केस मधून आरोपी अशोक शिवाजी घाटगे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये आरोपी विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात कलम ३६३ , ३६६, ३५४ ड , ३७६ आणि पोक्सो कलम ४, ८, १२ प्रमाणे अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी विरुद्ध वरील कलमानुसार विशेष न्यायालय ,कोल्हापूर येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सदर केस मध्ये सरकारी पक्षातर्फे आरोपीच्या दोषसिद्धी साठी जोरदार मांडणी करण्यात आली होती.सदर कामाची सुनावणी ३ वर्ष मे विशेष न्यायालयात चालली. परंतु आरोपीचे वकील सतिश कुंभार व भारत सोनूले यांनी केलेला युक्तिवाद योग्य व ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.कविता बी. अग्रवाल यांनी दि ३० मे रोजी सर्व आरोपांतुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या आरोपी तर्फे अँड. सतिश कुंभार , अँड भारत सोनूले , अँड सारंग कुराडे ,अँड प्रिती देवर्डेकर ,यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे अशाेल याला पुन्हा नवे जीवन प्राप्त झाले अशीच प्रतिक्रीया त्याचे पालक व सगेसाेयरे यांच्यासह अनेकांनी दिली.
आजकाल अनेक ठिकाणी लैंगिक छळाच्या, पाेक्साेच्या केसेस दाखल हाेत आहेत. काही अंशी या केसेस खऱ्या देखील आहेत, मात्र, काही केसेस मध्ये विनाकारण या पाेक्साे कायद्याचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे्. या पाेलीस तपासामुळे एकादा व्यक्ती नाहक या जाळ्यात सापडला जात आहे, त्यामुळे कायद्याच्या चाकाेरीत राहून, न्याय व्यवस्थेसमाेर अचूक मांडणी व याेग्य ते पुरावे सादर केल्यास नक्कीच न्याय मिळण्यास मदत हाेते, अशी प्रतिक्रीया वकील पत्र घेतलेले एँड. सतिश कुंभार यांनी सांगितले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.