वि. म. कलनाकवाडी शाळेची नूतन व्यवस्थापन समितीची निवड; हरिदास मोरबाळे अध्यक्ष, इंद्रजित गाडेकर उपाध्यक्ष

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गावातून नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे उत्साहात स्वागत

कलनाकवाडी (प्रतिनिधी) – सन २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी वि. म. कलनाकवाडी शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षणतज्ज्ञ, सचिव तसेच शिक्षक प्रतिनिधी यांचे शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले.

नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हरिदास आनंदराव मोरबाळे, तर उपाध्यक्षपदी इंद्रजित एकनाथ गाडेकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संतोष एकनाथ पोवार, पद्मा राहुल तांबेकर, धनश्री संदीप पेडणेकर, सातापा सखाराम वारके, मिनल योगेश राणे, समाधान शिवाजी सुतार, प्राजक्ता प्रमोद वारके, अस्मिता प्रमोद दबडे आणि रणजित दिनकर बोंडगे यांची निवड झाली. तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून राजेंद्र दिनकर शेणवी, समितीच्या सचिवपदी स्मिता सुरेश शिंदे, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून विठ्ठल सुभाष बंगाळे यांची निवड करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शालेय सुविधा, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता, पालक-शिक्षक समन्वय तसेच शाळेच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

नव्या समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला अधिक चालना मिळून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नूतन समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.