WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे तेजोमय क्रांतीकारी योध्दा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती.

भारत स्वातंत्र्य करण्यासाठी देशात दोन नद्यांचा उगम झाला.एक मवाळवादी तर दुसरी जहालवालवादी यांच्या संगमानेच 15 ऑगस्ट1947 ला भारत स्वतंत्र झाला.23 जानेवारी 1897 ला ओडिसा मधील कटक शहरात जन्माला आलेले नेताजी भारतासाठी चमकता तारा सिध्द झाले व स्वतंत्र भारतासाठी महान योध्दा म्हणून उदयास आले.नेताजींनी 15 वर्षाच्या वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून काढले व देश निर्माण करण्याची ज्वाला प्रज्वलित झाली आणि देश स्वतंत्र करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी संघर्षाला सुरुवात केली.कोलकत्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने नेताजी प्रभावीत झाले व त्यांच्या सोबत काम करायला सुरुवात केली.20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.यावेळी गांधींजींनीसुध्दा नेताजींना दासबाबू सोबत काम करण्याचा सल्ला दिला.कारण चित्तरंजन दास हे बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी पुढारी होते.त्यामुळे त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे.1925 साली इंग्रजांच्या लक्षात आले की नेताजी क्रांतीकारकांशी संबंध ठेवतात व क्रांतीकारकांचे स्फुर्तीस्थान असल्याचे त्यांच्या लक्षात आले.ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवीता त्यांना अनिश्चित काळासाठी  म्यांमारच्या कारागृहात बंदिस्त केले.

नेताजींचा संपूर्ण प्रवास अत्यंत संघर्षमय रहाला. कारण त्यांच्या व सहकाऱ्यांच्या रक्ताता-रक्तात स्वातंत्र्याची ज्वाला भडकत होती.त्यांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे भारत स्वतंत्र करणे यासाठीच त्यांनी विदेशी वारी करून इंग्रजाच्या दुश्मन राष्ट्रांशी हातमिळवणी करून भारतीय संघर्षाचा मोठा लढा आझाद हिंद सेनेच्या नेतृत्वात उभा केला.तेव्हाच 15 ऑगस्ट 1947 ला तिरंगा उदयास आला.कारण इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात आझाद हिंद सेनेचा मोठा वाटा आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना पहिल्यांदा 29 आक्टोंबर 1915 लाख राजा महेंद्र प्रताप सिगं यांनी केली.त्यावेळी आझाद हिंद सरकारची सेना म्हणून ओळखली जायची.यांचा उद्देश भारताला इंग्रजांपासुन स्वतंत्र करने.जेव्हा दक्षिण-पूर्वी एशियामध्ये जापानच्या सहयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 40 हजार भारतीय स्त्री-पुरूषांना प्रशिक्षीत करून सेनेत सहभागी  केले त्याला सुद्धा आझाद हिंद फौज असे नाव देण्यात आल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेचा सर्वोच्च कमाण्डर नियुक्त केल्यानंतर आझाद हिंद सेनेची संपूर्ण कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सोपविण्यात आली आणि सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतीकारी लढा सुरू झाला.नेताजी 1933 पासून 1936 पर्यंत युरोपमध्ये रहाले.तो काळ जर्मनच्या हिटलरचा नाझीवाद आणि इटलीचे नेते मुसोलिनीचा फासीस्टवाद असा होता.यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले.कारण या दोघांच्या निशाण्यावर इंग्लंड हाच देश होता.कारण इंग्लंडचे जगाच्या 75 टक्के देशावर अधिपत्य होते.त्यामुळे इंग्लंडचा जगावर अतीरेक वाढत होता.कारण इंग्लंडने पहिल्या विश्व युध्दानंतर जर्मनीवर एकतर्फी करार लादण्यात आले होते.त्याचाच बदला जर्मनी इंग्लंड कडून घेणार होता.भारतावरसुध्दा इंग्रजांचे राज्य होते.त्यामुळे याच संधीचा फायदा घेण्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मनात ठानले व नेताजींनी हिटलर व मुसोलिनी यांच्याशी हातमिळवणी केली.1943 मध्ये त्यांनी जर्मनीला सोडून ते जापानला जाऊन पोहोचले.

जापानचे प्रधानमंत्री जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जापानमधून सिंगापूरला गेले.वयोवृध्द क्रांतीकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील “फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवीले.त्याचप्रमाणे सिंगापूर इथे कॅप्टन मोहन सिंग व्दारा स्थापित “आझाद हिंद सेनेची”कमान आपल्या हाती घेतली.भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सरकारची स्थापना केली.तसेच “आझाद हिंद सेना” गठीत केली.या संघाचे प्रतीक चिन्ह असलेल्या झेंड्यावर डरकाळी मारणाऱ्या वाघाचे चित्र होते.कारण नेताजींची संपूर्ण कार्यशैली वाघासारखीच होती.आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीत प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. नेताजी 4 जुलै 1944 ला बर्मा पोहचले.इथुनच त्यांनी भारतीयांसाठी नारा दिला ” तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा”.1939 ला गांधी विचारधारेला हरवुन नेताजींची कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.यावर महात्मा गांधी म्हणाले की सुभाषचंद्र बोस यांचा विजय व माझा पराजय आहे.गांधीजींच्या या वक्तव्याने व विचारांमुळे सुभाषचंद्र बोस यांचे मन दुःखावले व स्वत:हुन कॉंग्रेस सोडली.कारण महात्मा गांधी मवाळवादी तर सुभाषचंद्र बोस जहालवादी विचारांचे होते.परंतु दोघांचाही लढा भारत स्वातंत्र्यासाठीच होता.1944 मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करतांना महात्मा गांधींनी नेताजींना “देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता. तर 4 जुन 1944 ला सिंगापूरवरून एक संदेश देतांना सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणुन संबोधले तेव्हा पासून महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधल्या जावु लागले.त्यामुळे महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतीकारीचा मार्ग अवलंबला.

रमेश कृष्णराव लांजेवार.                                     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

दोघांचाही लढा भारत स्वातंत्र्यासाठीच होता.त्यामुळेच 15 ऑगस्ट1947 ला भारत स्वतंत्र झाला.18 ऑगस्ट 1945 ला भारतासाठी दु:खद समाचार आला नेताजी सुभाषचंद्र बोस टोकियोला जातांना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला व त्यांचे स्वप्न अधुरे रहाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश स्तब्ध झाला. परंतु त्यांचे मृत शरीर अजुनही मिळाले नाही.म्हणुनच नेताजींच्या मृत्युच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू असल्याचे दिसून येते.आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी आपली वाममार्गाने कमवीलेली संपूर्ण  धनसंपत्ती देशहितासाठी स्वखुशीने खर्च केली तर ही खरी देशभक्ती ठरेल व नेताजींना खरी आदरांजली समजल्या जाईल.आजच्या युवा पिढीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आचार-विचार जागृत होने गरजेचे आहे.कारण देश निर्माण,देशाची प्रगती,देशाचा विकास नेताजींच्या विचारांनीच जलदगतीने पुढे जावु शकतो.त्याच बरोबर मी देशवासियांना आग्रह करेल की नेताजींच्या126 व्या  जयंतीचे औचित्य साधून  प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावावेत व देशात 126 कोटी वृक्ष एकाच दिवशी लावण्याचा संकल्प जनतेनी व सरकारनी घ्यावा.यामुळे संपूर्ण भारत निसर्ग रम्य होवून प्रदूषणावर मात करण्यात आपण यशस्वी होवू.सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!जय हिंद!

 

https://positivewatch.in/journalism-should-be-nurtured-and-political-leaders-and-the-government-should-take-responsibility-to-ensure-that-journalism-and-the-fourth-pillar-are-not-harmed/

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.