WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज – राहुल रेखावार

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून आढावा…

कोल्हापूर : राज्य शासन दिनांक 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 13 जून 2023 रोजी तपोवन मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात येत असून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले जनकल्याण कक्षाचे समन्वयक तथा मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सतीश जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, रवींद्र माने यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत 1 जून 2023 पासून नवीन 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांना आवश्यक असलेल्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तपोवन मैदानावर होणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्याचा महासंकल्प करण्यात आला असून यातून शासन, प्रशासन हे सामान्य लोकांसाठी कार्यरत असून अधिक गतीने काम करत असल्याचे कृतीतून दिसायला हवे. यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती या उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशासनात काम करत असताना फक्त कर्तव्य म्हणून काम न करता सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर समाधान येण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी प्रत्येकाने सेवाभावी वृत्तीने काम केल्यास शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणे शक्य होईल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांची ने -आण करणे व लाभार्थ्यांना नाश्तापाणी, ओ.आर.एस. पॅककेट देणे तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या रिटर्न फूडची व्यवस्था आदी बाबतचे सूक्ष्म नियोजन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी सांगितले.

प्रवासात व कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्यव्यवस्था व अन्य नियोजन नीटनेटके असावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी साहित्य वाटप लाभार्थ्यांची यादी व त्यांच्या पासची व्यवस्था करावी. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी नियुक्त केलेले सर्व नोडल अधिकारी व त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारी बाबत सविस्तर आढावा घेऊन दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे व अन्य अनुषंगिक बाबी बाबत मार्गदर्शन केले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी